Awaj India
Register
Breaking : bolt
संचमान्यतेस 10 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ द्या : राजेंद्र कोरेकोल्हापुरात रविवारी जीप (4X4) ऑफ रोडिंगचा थरार दिव्यांग खेळाडूंना पॅरा पिकलबॉलसाठी मोफत कोर्ट स्पोर्ट्स सेंटर कोल्हापूरचा कौतुकास्पद उपक्रमडी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या* *विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअप*आदिवासींवरील क्षेत्रीय बंधन कायद्याला ५० वर्षे; सामाजिक, शैक्षणिक व राजकीय विषमतेचा प्रश्न कायममंगेश चिवटे यांना राजर्षी शाहू विकास आघाडीची उमेदवारी देऊ आणि त्यांना ताकदीने निवडून आणू* शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांचा संघर्ष; १८ मागण्यांचा जाहीरनामा प्रसिद्धशिक्षकहिताचा मुद्दा केंद्रस्थानी; कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा उत्साहात शुभारंभ*डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये* *'गौराई खेळ' स्पर्धा उत्साहात*तुझको मिरची लगी तो मै क्या करू

जाहिरात

 

संचमान्यतेस 10 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ द्या : राजेंद्र कोरे

schedule01 Oct 26 person by visibility 16 categoryशैक्षणिकक्रीडा


कोल्हापूर दि. ०१ : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या आधार व्हॅलिड विद्यार्थी संख्या यु-डायस व सरळ पोर्टल व नोंदवणे व संच मान्यता फॉरवर्ड करणेस 10 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षक महासंघाचे राज्य सचिव  राजेंद्र कोरे यांनी केली आहे.  सदरची मागणी राज्याचे शिक्षण आयुक्त,शिक्षण संचालक प्राथमिक व  माध्यमिक तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडे ई-मेल द्वारे केली आहे.    

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक वर्ष 2026 -27 मधील आधार व्हॅलिड विद्यार्थी संख्या यु-डायस व सरळ पोर्टल व नोंदवणे व फॉरवर्ड करणेबाबत 30 सप्टेंबर 2026 दिनांक निश्चित करण्यात आली आहे.
 
तथापि 30 सप्टेंबर रोजी सरल पोर्टलवर विद्यार्थी माहिती नोंदवत असताना अनेक शाळा मुख्याध्यापकांना समस्या निर्माण झाले आहेत.साईट दिवसभरात बराच वेळ हँग झाल्यामुळे विद्यार्थी संख्या नोंदवव्यात अडचणी निर्माण झाले आहे. यु-डायस वरील नोंदवलेले विद्यार्थी सरल पोर्टलवर न दिसणे, आधार कार्ड असून पाच वर्षानंतर आधार अपडेट न केलेले विद्यार्थी यांची माहिती व्हॅलीड न होणे.
    तसेच अनेक विद्यार्थ्यांच्याकडे जन्माचे दाखले आहेत, परंतु सदर दाखल्यावर QR कोड नसल्यामुळे आधार कार्ड बनत नाही. तसेच अनेक विद्यार्थ्यांच्याकडे जन्म दाखला नसल्यामुळे आधार कार्ड नसलेले विद्यार्थी इन व्हॅलिड होत आहेत अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना संचमान्यतेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या ग्राह्य धरण्यासाठी शासन स्तरावर स्पष्ट आदेश व्हावेत.
     तरी वरील तांत्रिक अडचण पाहता सरळ पोर्टलवर विद्यार्थी संख्या नोंदवणे व संचमान्यता फॉरवर्ड करणे यासाठी 30 सप्टेंबरची मुदत वाढवून ती १० ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढवावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes