Awaj India
Register
Breaking : bolt
मंगेश चिवटे यांना राजर्षी शाहू विकास आघाडीची उमेदवारी देऊ आणि त्यांना ताकदीने निवडून आणू* शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांचा संघर्ष; १८ मागण्यांचा जाहीरनामा प्रसिद्धशिक्षकहिताचा मुद्दा केंद्रस्थानी; कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा उत्साहात शुभारंभ*डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये* *'गौराई खेळ' स्पर्धा उत्साहात*तुझको मिरची लगी तो मै क्या करू आय ट्रिपल ई’ च्या माध्यमातून* *संशोधन व नवोपक्रमाची वाट शोधा*एस.व्ही.सी. को-ऑपरेटिव्ह बँकेकडून माझ्यावर अन्याय शिवसेना, जनसुराज्य पक्षाची भूमिका मांडणारे मुश्रीफ कोण 14 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेला श्रीलंका,थायलंड,जपान, नेपाळ आदी देश विदेशातील बौद्ध धर्मगुरूंशी संवाद गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इस्पूर्ली पोलिसांची मोठी कारवाई: आगमन व विसर्जन मार्गावर शांतता काळातील आवाजाचे 'नील पंचनामे' पूर्ण*

जाहिरात

 

शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांचा संघर्ष; १८ मागण्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध

schedule28 Sep 26 person by visibility 7 categoryशैक्षणिक

आवाज इंडिया प्रतिनिधी 
कोल्हापूर : शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त करत शिक्षक मित्र श्री. कौस्तुभ शुभांगी मुरलीधर गावडे यांनी आपल्या १८ कलमी मागण्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. शिक्षकांचे प्रश्न केवळ वेतनापुरते मर्यादित नसून शिक्षणव्यवस्थेतील गुणवत्तावाढ, शिक्षकांना प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि शैक्षणिक सुविधांशी संबंधित प्रश्नांवरही त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
गावडे यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासात शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील आदी समाजसुधारकांच्या विचारांचा संदर्भ देत शिक्षकांनी सामाजिक परिवर्तनात महत्त्वाची भूमिका बजावावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
गावडे यांच्या जाहीरनाम्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी पाठपुरावा, दीर्घकाळ सेवा बजावलेल्या शिक्षकांना TET मधून सूट, पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरती प्रक्रिया नियमित करण्यासाठी प्रयत्न, शिक्षक भरतीबरोबरच आवश्यक विषयांतील विशेष शिक्षकांची नियुक्ती, अनुदानास पात्र संस्था व वाढीव तुकड्यांना वेळेत अनुदान मिळवून देणे आदी मागण्यांचा समावेश आहे.
तसेच शिक्षकांवरील अनावश्यक अशैक्षणिक कामांचा भार कमी करणे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे वाढणारा कार्यभार लक्षात घेऊन प्राध्यापक पदांचे संतुलन राखणे, ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील अडचणी दूर करणे, आश्रमशाळांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे आणि तृतीय-पक्ष लेखापरीक्षण प्रक्रियेबाबत आवश्यक सुधारणा करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे त्यांनी नमूद केले आहे.
ITI प्रशिक्षकांसाठी Faculty Development आणि Training of Trainers, महिलांच्या रजेसंदर्भातील प्रश्न, RTE अंतर्गत विद्यार्थ्यांच्या शुल्काबाबत शाळांना मिळणारे अनुदान, शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्यविषयक सुविधा, इयत्ता ८ वी ते १२ वीच्या अध्यापनासाठी पदवीप्राप्त D.Ed. शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी, सी.एच.बी. प्राध्यापकांच्या मानधनात वाढ तसेच सेवानिवृत्त शिक्षकांना अनुदान मिळवून देणे, या मागण्यांचाही जाहीरनाम्यात समावेश आहे.
शिक्षकांचे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी व्यापक आणि संघटित प्रयत्नांची गरज असल्याचे गावडे यांनी म्हटले आहे. “शिक्षक हितासाठी कटिबद्ध... शिक्षकांसाठी झटणारे नेतृत्व... पुणे विभागातील शिक्षकांचा बुलंद आवाज” असा संदेश देत त्यांनी शिक्षकांच्या प्रश्नांसाठी पुढील काळात सातत्याने पाठपुरावा करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes