२४ फेब्रुवारी मेरी वेदर मैदान येथे चार दिवस चालणार प्रदर्शन*
schedule21 Feb 25 person by visibility 24 categoryराजकीय

*२१ ते २४ फेब्रुवारी मेरी वेदर मैदान येथे चार दिवस चालणार प्रदर्शन*
*हरियाणातील विधायक नावाचा रेडा,अन्य पशु जनावरे,शेती उपयुक्त साहित्य पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी आवर्जून भेट देण्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन*
चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात नामांकित कंपन्यांचा सहभाग,शेतकऱ्यांनी प्रदर्शनास भेट देण्याचे खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहन
विविध जनावरांचा, पशू पक्षांचा सहभाग, तांदूळसह शेतीपूरक साहित्य खरेदी करण्याची पर्वणी
कोल्हापूर/प्रतिनिधी : खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून १६ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेले पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य असे *भीमा कृषी व पशु पक्षी प्रदर्शन* येत्या २१ ते २४ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व त्यांना शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी यावर्षी ही हे भव्य कृषी प्रदर्शन मेरी वेदर मैदानावर भरविण्यात येत असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.२०२५ मध्ये भरविण्यात आपल्या या प्रदर्शनाचे खास आकर्षण प्रदर्शनाचे खास आकर्षण जगातील सर्वात उंच हरियाणातील विधायक नावाचा सात वेळा नॅशनल चॅम्पियन मिळालेला मुऱ्हा जातीचा रेडा आहे.
देश-विदेशातील विविध नामांकित कंपन्यांचा सहभाग प्रदर्शनात असून विविध जातिवंत जनावरे, पशुपक्षी, तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. अशीही माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
या प्रदर्शनाचे उदघाटन २१ फेब्रुवारीस दुपारी ४.३० वाजता महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.हसनसो मुश्रीफ,कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची अध्यक्षस्थानी उपस्थिती असणार आहे.याचबरोबर आमदार अमल महाडिक,खासदार धैर्यशील माने आणि सर्व आमदार मान्यवर उपस्थित असणार आहेत.
प्रदर्शनामध्ये देश-विदेशातील विविध प्रचलित कंपन्यांचा समावेश आहे. याचबरोबर पशुपक्षी पालन, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, शेतकऱ्यांना उपयुक्त मार्गदर्शन तज्ञांची व्याख्याने आणि विविध कंपन्यांचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी विविध तंत्रज्ञान उपयुक्त माहिती देणारे हे सर्वात मोठे प्रदर्शन आहे. तरी या प्रदर्शनास शेतकऱ्यांनी आवर्जून भेट द्यावी असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी केले आहे.
या प्रदर्शनामध्ये ४५० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा समावेश आहे.त्याचबरोबर भागीरथी महिला संस्थेच्या मा. सौ अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली २०० बचत गटांना मोफत स्टॉल देण्यात आले आहेत.ज्याद्वारे महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाला या ठिकाणी थेट बाजारपेठ मिळवून दिली जाणार आहे.त्यामध्ये खाद्यपदार्थ नाचणी पापड यांचा समावेश आहे.चार दिवस याठिकाणी शेतकऱ्यांना भागीरथी महिला संस्थेच्या वतीने मोफत झुणका भाकरी दिली जाणार आहे.
तर २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या सांगता समारंभ व बक्षीस वितरण समारंभास राज्याचे आरोग्य मंत्री कोल्हापूरचे पालकमंत्री ना.प्रकाश आबिटकर,सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील उपस्थित असणार आहेत.यावेळी सर्व आमदार उपस्थित असणार आहेत.
*व्याख्यानांची माहिती*
दुपारच्या सत्रात कृषी तज्ञांची व्याख्याने दुपारी १२ ते ४ या वेळेत होणार आहेत. यात
२२ फेब्रुवारी रोजी पश्चिम महाराष्ट्रातील गळीत धान्य पीक लागवड तंत्रज्ञान या विषयावर
डॉ. प्रशांत बाळासाहेब पवार, प्राध्यापक, कृषीविद्या विभाग, शासकीय कृषी महाविद्यालय, कराड, जिल्हा सातारा.
दुर्लक्षित फळझाडांची लागवड व प्रक्रिया तंत्रज्ञान या विषयावर
डॉ. विष्णू कुंडलीक गरांडे, सहयोगी संशोधन संचालक, विभागीय संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे.आणि अचूक व काटेकोर जमीन व्यवस्थापन उत्पादनवाढीसाठी गरजेचे या विषयावर डॉ. जनार्दन पांडुरंग पाटील माजी वरिष्ठ संशोधन अधिकारी, प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर. हे वक्ते आपले विचार व्यक्त करणार आहेत.
२३ फेब्रुवारी रोजी डॉ. संजय आसवले, माजी प्राध्यापक, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर हे किफायतशीर दुग्ध व्यवसाय असा करा यावर विचार मांडणार आहेत.तर डॉ. अशोक दत्तात्रय कडलग प्रमुख शास्त्रज्ञ, कृषीशास्त्र व तंत्रज्ञान विभाग, वसंतदादा साखर संस्था, मांजरी बुद्रुक, पुणे हे ऊस उत्पादनातील आव्हाने, जमीन व पीक व्यवस्थापन आणि ए. आय. तंत्रज्ञानाचा उत्पादन वाढीसाठी अचूक वापर.
२४ फेब्रुवारी पद्मश्री श्री. पोपटराव भागूजी पवार, माजी सरपंच, आदर्शगांव हिरवे बाजार, ता. जि. अहमदनगर हे ग्रामविकासामध्ये कृषीचे महत्व व ग्रामीण पातळीवर शेतकरी सहभाग.
आणि आधुनिक केळी लागवड तंत्रज्ञान या विषयावर डॉ श्री. सुरेश मगदूम, सिनीअर कृषी विध्यावेता, जैन इरिगेशन सिस्टीम लि., जळगांव.आपले विचार व्यक्त करणार आहेत.
*सहभागी कंपन्या*
विला पंप, पॉप्युलर एग्रीकल्चर इम्प्लिमेंट, समृद्धी ट्रॅक्टर अँड मशिनरीजे, लक्ष्मी पंप, टाटा सोलर, तालोड फूड्स,चितळे डेअरी, कोल्हापूर ऑटोमोबाईल डीलर असोसिएशन ,गोविंद मिल्क प्रॉडक्ट, वनिता ऍग्रो केम, जैन इरिगेशन लि, विजय कृषी अवजारे, स्वाती मसाले,बाहुबली प्लास्टिक, डेक्कन फार्म इक्विपमेंट, जीएनपी ऍग्रो केअर सायन्स आदी नामांकित कंपन्या प्रदर्शनात सहभागी होत आहेत.या कंपन्यांची आणि अन्य उत्पादने पाहावयास मिळणार आहेत.
*दिले जाणारे पुरस्कार*
या प्रदर्शनामध्ये शेतीभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. तर शेतकऱ्यांना शेती भूषण कृषी सहाय्यक, कृषी संशोधन शास्त्रज्ञ, भीमा जीवन गौरव भीमा कृषी रत्न पुरस्कार दिले जाणार आहेत. आणि कृषी विभागाच्या वतीने ही उत्कृष्ट शेतकऱ्यांचा आणि खाद्य स्टॉल स्पर्धा, पीक स्पर्धांचे,जनावरे यांच्या स्पर्धांना बक्षीसे दिली जाणार आहेत.
आत्माच्या वतीने शेतकरी गट कंपन्यांची माहिती दिली जाणार आहे शिवाय प्रदर्शनामध्ये तांदूळ महोत्सव हेही आकर्षण असणार आहे. ज्यामध्ये आजरा घनसाळ, रत्नागिरी २४,भोगावती, इंद्रायणी आदि नमुनांचे तांदूळ असणार आहेत. तसेच बाजरी नाचणी गूळ,हळद विक्रीसाठी असणार आहेत.शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतीसाठी उपयुक्त तंत्रज्ञान,सेंद्रिय शेती,मत्स्यपालन कसे करावे याची प्रात्यक्षिके पहावयास मिळणार आहेत.तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती व याठिकाणी दिली जाणार आहे.तसेच विविध प्रकारचा स्थानिक आणि विदेशी भाजीपाला, ऊस, बी - बियाणे पाहाव्यास मिळणार आहेत.
याचबरोबर प्रदर्शनामध्ये लाल कंधारी गाय, पंढरपूर मधील गायी, संकरित गायी म्हैशी, जाफराबादी उस्मानाबादी शेळी, बोकड, कडकनाथ कोंबडी, सस्ते पांढरे उंदीर तसेच कुक्कुटपालन इमूपालन वैशिष्ट्यपूर्ण वेगवेगळ्या जातीच्या कोंबड्या बैल घोडे, पशुपक्षी विविध जनावरांच्या जाती पहावयास मिळणार आहेत. त्याचबरोबर पीक स्पर्धा, पुष्पस्पर्धा विविध जनावरांच्या स्पर्धा खाद्य महोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रम तीन दिवस या ठिकाणी होणार आहेत.
प्रदर्शनास हाऊस ऑफ इव्हेंट, असोसिएशन संस्थेने कृषी प्रदर्शनाला सहकार्य केले आहे. व आपला सहभाग नोंदवला आहे. कृषी व किसन कल्याण मंत्रालय,शेती विभाग महाराष्ट्र राज्य, पशुसवर्धन विभाग,आत्मा, जिल्हा परिषद कोल्हापूर,एचसीपीएसी यांचे सहकार्य लाभले आहे. प्रदर्शन चार दिवस सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.याचबरोबर लाईव्ह डेमिस्ट्रेशन असणार आहे.