+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustजिल्हा परिषदेमार्फत 'गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रम* adjustहिंदू देव देवितांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन adjustहुकुमशाही विषवल्ली तोडून टाकण्यासाठी नारीशक्ती एक व्हा आणि शाहूंना विजयी करा adjustखतीजा शकील मेस्त्री राज्यात पहिली adjustजनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी शाहू महाराजांना निवडून द्या adjustनिगवे येथे शाहू छत्रपतींनी साधला संवाद adjustमाजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी दिला शाहू महाराजांना शब्द adjustदेशात भाजपचा हुकूमशाही कारभार ;सौरभ खेडेकर यांची टीका adjustशाहू छत्रपती यांची रंगपंचमी; संभाजी राजे यांची जूनची हमी adjustगोकुळ’ च्या कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन संघाच्या आणि दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी काम करावे
schedule27 Mar 24 person by visibility 35 categoryराजकीय

*31 मार्च पर्यंत नोंदणी, 7 एप्रिल रोजी सकाळी 6.30 वा धावणार हजारो मतदार नागरिक*

*कोल्हापूर, दि. 26* : मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने रन फॉर वोट मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये जिल्हयातील सर्व शासकीय विभागांसह महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग घ्या अशा सूचना जिल्हाधिकारी, अमोल येडगे यांनी मॅरेथॉन नियोजन बैठकीत स्वीप समितीला दिल्या. मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने रविवार, दि.7 एप्रिल 2024 रोजी जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांचेतर्फे स्वीप अंतर्गत “रन फॉर वोट” या "लोकशाही मॅरॅथॉन" चे आयोजन करण्यात आले आहे. “चला धावू या – सुदृढ आरोग्यासाठी, मतदान करूया बळकट लोकशाहीसाठी” हे या लोकशाही मॅरॅथॉनचे ब्रीद वाक्य आहे. हा मतदार जनजागृतीचा कार्यक्रम यशस्वीरीरत्या पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली यावेळी उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, उपायुक्त साधना पाटील, अश्विनी नराजे, जिल्हा आरोग्य अधिकारी राजेश गायकवाड, शिक्षणाधिकारी एकनाथ अंबोकर, लीड बँकेचे गणेश गोडसे, स्वीप सहायक नोडल अधिकारी वर्षा परिट, सुनिल धायगुडे यांचेसह अशासकीय सदस्य उपस्थित होते.

पोलीस ग्राऊंड येथे 7 एप्रिल रोजी सकाळी 6.00 सर्व सहभागी एकत्र जमणार आहेत. 6.30 वा. 10 किमी साठी धावणारे मतदार धावतील. त्यानंतर 6.40 वा. 5 किमी तर 6.50 वा. 3 किमीसाठी धावणारे मतदार धावतील. याठिकाणी मतदार जनजागृसाठी स्टॉल्स, बॅनर उपलब्ध करण्यात येणार आहेत. या अनुशंगाने विविध विभागांना जबाबदाऱ्यांचे वाटप यावेळी करण्यात आले. मॅरॅथॉन मार्गावर पाण्याची, रुग्णवाहीकेची तसेच इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात येणार आहे. कोल्हापूर शहरामधील मतदारांनी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने कोल्हापूर येथे लोकशाही मॅरॅथॉन होणार आहे. 
या मॅरॅथॉनमध्ये कोल्हापूर शहरातील विविध शासकीय, निम शासकीय, महामंडळे, राष्ट्रियीकृत बँका व सहकारी बँका, संस्था कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, मतदार नागरिक यांनी मोठ्या संख्येने उत्सफूर्तपणे सहभागी होणार आहेत. सहभाग नोंदविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे गुगल फॉर्म उपलब्ध करुन दिलेला असून 31 मार्च पर्यंत https://forms.gle/ZjEeU27NYRwoVQ6J9 या लिंकवरती धावपटू नि:शुल्क नोंदणी करु शकतील.