*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या राज निकमची* *बल्गेरिया येथे रिसर्च इंटर्नशिपसाठी निवड*
schedule12 Mar 25 person by visibility 213 category

कसबा बावडा
येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा संगणक अभियांत्रिकी विभागातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी राज निकम याची युरोपियन कमिशनच्या "इंटरनॅशनल समर इंटर्नशिप प्रोग्रॅम" च्या अंतर्गत बल्गेरिया येथे रिसर्च इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. ६ आठवड्यांसाठी बल्गेरिया येथील प्रोजेक्टवर तो काम करणार आहे.
बल्गेरिया येथील "टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ सोफिया" येथे ऑगमेंटेड रिॲलिटी, ऍनिमेशन, ध्वनींचे विश्लेषण अशा विविध प्रकारच्या संशोधनात्मक प्रकल्पांवर काम करण्याची संधी त्याला मिळाली आहे. अनेक प्रकारच्या ऑनलाईन मुलाखती व कठोर चांचण्यांमधून राजने ही फेलोशिप मिळवली आहे.
या निवडीसाठी अधिष्ठाता डॉ. अमरसिंह जाधव, विभागप्रमुख प्रा. राधिका ढणाल व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन मिळाले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे यांनी या यशाबद्दल राजचे अभिनंदन केले आहे.
कसबा बावडा: बल्गेरिया येथील रिसर्च इंटर्नशिपसाठी निवड झालेल्या राज निकमचे अभिनंदन करताना डॉ. अनिलकुमार गुप्ता. समवेत डॉ. संतोष चेडे, डॉ. लितेश मालदे, डॉ. अमरसिंह जाधव, प्रा. सदानंद सबनीस आदी.