Awaj India
Register
Breaking : bolt
*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या* *६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड*दादासाहेब गवई यांच्या ११ व्या स्मृतीदिनानिमित्त कोल्हापुरात अभिवादनजागतिक आय.व्ही.एफ. दिनानिमित्त विशेष: पत्की हॉस्पिटलमध्ये मृत्यूच्या छायेतून उमलले नवजीवन!करवीरचे माजी तहसील स्वप्नील रावडे, शिवाजी पोवार आदींनी संगनमताने ६५० कोटींचा माल लांबवला लाठीमाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहनडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला* *'अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय' दर्जा*साखर उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी* *उपपदार्थांचे मूल्यवर्धन गरजेचे*अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराबाबत कुटुंब आणि समाजाची जबाबदारी प्रज्वल दिलीप पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजनसवतकडा धबधबा परिसरात एडव्हेंचर स्पोर्ट्सचा विस्तार; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण*

जाहिरात

 

‘तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा’चा संदेश; प्राची माळीने नेत्रदानातून दिली प्रेरणा

schedule26 Apr 26 person by visibility 2492 categoryसामाजिक

कोल्हापूर: रामानंद संप्रदाय कोल्हापूर जिल्हा सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष कृष्णात माळी (रा. लाटवडे) यांची द्वितीय कन्या तसेच सोमनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक माळी यांची पुतणी कै. सौ. प्राची दिग्विजय माळी (वय २४) हिचे दि. २४ रोजी अल्पशा आजाराने कोल्हापूर येथील हायटेक हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान आकस्मिक निधन झाले. तिच्या अचानक झालेल्या निधनाने लाटवडे व पेठ परिसरावर शोककळा पसरली असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.
जगद्गुरु रामानंदाचार्य श्रीमद नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेने प्राचीने मरणोत्तर देहदानाचा संकल्प करून संबंधित संस्थेकडे फॉर्मही भरला होता. “तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा” या शिकवणीनुसार तिने नेत्रदानाची इच्छा व्यक्त केली होती.
तिच्या निधनानंतर तिचे वडील कृष्णात माळी, चुलते अशोक माळी, पती दिग्विजय माळी तसेच भाऊ गुरुप्रसाद माळी व शुभम माळी आणि संपूर्ण कुटुंबीयांनी तिची अंतिम इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोल्हापूर येथील ॲस्टर आधार हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तिचे नेत्रदान पूर्ण केले.
प्राचीच्या या उदात्त कृतीमुळे एका गरजू व्यक्तीला दृष्टी मिळणार असून तिच्या निर्णयामुळे मरणोत्तर देहदान व अवयवदानाबाबत समाजात जागृती निर्माण होण्यास हातभार लागणार आहे. जगद्गुरुंच्या प्रेरणेने झालेले हे १५९ वे अवयवदान असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या प्रसंगी रामानंद संप्रदाय कोल्हापूर जिल्हा सेवा समितीचे पदाधिकारी, गुरुबंधू व गुरु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes