Awaj India
Register
Breaking : bolt
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दुग्ध व्यवसायातून ‘गोकुळ’शी ऋणानुबंध कायम ठेवावा - नविद मुश्रीफडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा* *‘ब्रह्माकुमारी’ सोबत सामंजस्य करार*आर्किटेक्चर नंतर करिअरच्या* *अमर्याद संधी - डॉ. ए. के. गुप्ता*नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कधी भरपाई देणार**डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये* *शनिवारी ‘डायबेटिक फूट’वर परिषद*अतिसार थांबवा अभियान’ प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी अमोल येडगे*खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण* :वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडून विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा*वनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा. डॉ. के. प्रथापन* चुये येथे बेंदूर सण उत्साहात साजरा

जाहिरात

 

तुझ्याचसाठी काव्यसंग्रह वाचकांना भावेल : चंद्रकांत पोतदार*

schedule01 Jun 25 person by visibility 206 categoryउद्योग

*तुझ्याचसाठी काव्यसंग्रह वाचकांना भावेल : चंद्रकांत पोतदार*
 
*प्रेमाचं महत्त्व सांगणारी तुझ्याचसाठी..! पुस्तकाचे प्रकाशन*
 
कोल्हापूर : कवीता हा अंतरात्म्याचा आवाज असतो. कवी कवीतेतून बोलत असतो. वाचक कवितामय होवून वाचत असतो. याच वैशिष्ट्यावर प्रेम काय असतं. प्रेम कसं केलं पाहिजे, पती-पत्नीतील प्रेमाचा गोडवा कसा असावा, या सगळ्या प्रेमाच्या गोष्टी उलगडून सांगणारा कवीता संग्रह म्हणजे ‘तुझ्याचसाठी’..! हा काव्यसंग्रह नक्कीच वाचकांना भावेल असा विश्वास ज्येष्ठ कवी, साहित्यिक डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी व्यक्त केला. कवियत्री जान्हवी किशोर माने लिखित तुझ्याचसाठी या काव्य संग्रह पुस्तकाचा प्रकाशन सोहळा हॉटेल वृषाली येथे रविवारी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महावीर विद्यालयाचे मराठी विभागप्रमुख सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. गोपाळ गावडे होते.
 
लेखिका-कवी जान्हवी किशोर माने या गृहीणी आहेत. त्यांना लहानपणापासून वाचन-लिखाणाची आवड आहे. त्यांनी प्रेमाचं महत्त्व सांगणारी ‘तुझ्याचसाठी’ ही कवीता संग्रह पुस्तीका भाग्यश्री प्रकाशनाच्या माध्यमातून पहिल्यांदाच वाचकांसमोर आनली आहे. या पुस्तीकेचा प्रकाशनसोहळ्यास खासदार धैर्यशील माने यांनी आँनलाईन व्हिडीओद्वारे शुभेच्छा दिल्या. महावीर महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. गोपाल गावडे, ज्येष्ठ कवी साहित्यिक डॉ. चंद्रकांत पोतदार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य मंडळाचे कार्यवाह डॉ. विनोद कांबळे, सारथी विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष डॉ. संभाजी खोत, मणेर हायस्कूल इचलकरंजीच्या मुखाध्यापिका वैशाली कुलकर्णी, पत्रकार एकनाथ पाटील आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत ‘तुझ्याचसाठी’ काव्य संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कवी पोतदार म्हणाले, कवियत्री जान्हवी माने यांच्या कवीतेत कवितेचा कोणताही मापदंड न लावता केवळ कविता आस्वादाने हे उचित ठरेल अशी त्यांची प्रेम कवीता आहे. कवितेच्या उदंड वाटचालीत प्रेमाच्या-विरहाच्या असंख्य आठवणींना घेऊन त्यांनी कवितेच्या प्रांतात पहिले पाऊल टाकले आहे. कवितेचा त्यांचा प्रवास खूप लांबवरचा असला तरी पहिले पाऊल टाकणे अधिक महत्त्वाचे असते. कवितेच्या प्रवासात या पुढील काळातही अधिक भक्कमपणे ही पावले पडतील, अशी अशादायकता या कवितेत आहे. सखोल चिंतन, सभोवतालचा अस्वस्थपणा आणि संवेदनशील नजर व सामाजिक भान त्यांच्या कवितेतून अधिक प्रगल्भ चिंतनशीलतेने साकारत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. गोपाल गावडे, डॉ. विनोद कांबळे, डॉ. संभाजी खोत, वैशाली कुलकर्णी, प्रशाांत सत्यश, जान्हवी माने आदी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचलन डॉ. प्रिया दंडगे यांनी केले. स्वागत-प्रास्ताविक किशोर माने यांनी तर आभार भाग्यश्री प्रकाशनच्या भाग्यश्री पाटील-कासोटे यांनी मानले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes