+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustजिल्हा परिषदेमार्फत 'गुढीपाडवा शाळा प्रवेश वाढवा' उपक्रम* adjustहिंदू देव देवितांवर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा : भाजपाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन adjustहुकुमशाही विषवल्ली तोडून टाकण्यासाठी नारीशक्ती एक व्हा आणि शाहूंना विजयी करा adjustखतीजा शकील मेस्त्री राज्यात पहिली adjustजनतेचे प्रश्न लोकसभेत मांडण्यासाठी शाहू महाराजांना निवडून द्या adjustनिगवे येथे शाहू छत्रपतींनी साधला संवाद adjustमाजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी दिला शाहू महाराजांना शब्द adjustदेशात भाजपचा हुकूमशाही कारभार ;सौरभ खेडेकर यांची टीका adjustशाहू छत्रपती यांची रंगपंचमी; संभाजी राजे यांची जूनची हमी adjustगोकुळ’ च्या कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन संघाच्या आणि दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी काम करावे
schedule13 Mar 24 person by visibility 111 categoryराजकीय
माजी आमदार अमल महाडिक यांच्याकडून निधीचा धडाका; पर्यटन विकास मधून दक्षिण साठी सव्वादोन कोटींचा निधी

        कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी भरघोस निधी आणण्याचा धडाका माजी आमदार अमल महाडिक यांनी सुरूच ठेवला आहे. पर्यटन विकास आराखड्यातून दक्षिण साठी त्यांनी तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. 

         या निधीतून निगवे खालसा येथील नृसिंह सरस्वती स्वामी मंदिराजवळ रस्ते आणि गटारी करण्यासाठी 25 लाख रुपये, गिरगाव येथील रेणुका माता मंदिराचा विकास करण्यासाठी 50 लाख, गडमुडशिंगी येथील धुळसिद्ध बिरदेव मंदिराच्या आवारात प्रसाद मंडप उभारण्यासाठी 50 लाख, कंदलगाव येथील हनुमान मंदिराकडे जाणारा रस्ता करण्यासाठी 50 लाख आणि नेर्ली येथील बिरदेव मंदिर परिसरामध्ये आरसीसी कंपाउंड आणि रस्ता करण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 

      या निधीतून लवकरच विकास कामांचा शुभारंभ होणार आहे. पदावर नसतानाही मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी माजी आमदार अमल महाडिक यांनी केलेला पाठपुरावा कौतुकाचा विषय ठरतोय. 

        कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या मंदिर आणि पर्यटन स्थळांच्या विकासासाठी निधी प्राप्त करून देण्यासाठी इथून पुढच्या काळातही प्रयत्नशील राहणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले.