Awaj India
Register
Breaking : bolt
आबाजी होणं सोपं नाही!अबब!!!! अंबाबाईच्या भक्तांकडून तब्बल चारशे किलो खिचडी, वाटपसाताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!*शिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा, शिक्षिकांना विशेष रजा मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार!*सोलापुरात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात; शिक्षक संघटना आणि शिक्षक नेत्यांचा भक्कम पाठिंबा!*शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांना पसंतीक्रमांक १ चे मत देऊन विजयी करा!स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीची ताकद*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शनकुर्डूवाडी-माढा परिसरात शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!*सीएचबी प्राध्यापकांच्या प्रश्नांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार: शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे*

जाहिरात

 

‘गोकुळ’ मार्फत गोचिड निर्मुलन व मोफत थायलेरीया लसीकरण मोहीम....

schedule28 Feb 24 person by visibility 398 categoryराजकीय

‘गोकुळ’ मार्फत गोचिड निर्मुलन व मोफत थायलेरीया लसीकरण मोहीम....

                                                                               मा.श्री.अरुण डोंगळे  

चेअरमन – गोकुळ दूध संघ

 

कोल्‍हापूर:ता.२८ कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या, कोल्‍हापूर (गोकुळ) मार्फत जिल्‍ह्यातील जनावरांना सामूहिक गोचिड निर्मुलन व मोफत थायलेरीया लसीकरण मोहीम चालू करण्‍यात आली असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी आपल्या जनावरांना गोचिड निर्मुलन व मोफत थायलेरीया लसीकरण करून घेणेत यावे असे आवाहन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी मौजे चांदेकरवाडी ता. राधानगरी येथे या मोहीमेच्या उद्‌घाटन प्रसंगी केले, यावेळी संघाचे अधिकारी, गावातील दूध संस्थांचे पदाधिकारी, दूध उत्पादक उपस्थित होते.

          पुढे बोलताना चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, जिल्ह्यामध्ये सध्या थायलेरीया (गोचिड ताप) हा आजार जनावरांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येत आहे, या आजाराचा प्रसार गोठ्यातील गोचिडामुळे होतो परिणामी अशी जनावरे कायम स्‍वरूपी निकामी होतात अथवा त्‍यांच्‍या दूध उत्‍पादन व प्रजनन शक्‍तीवर मोठा परिणाम होत असल्यामुळे दूध उत्पादकांचे आर्थिक नुकसान होते, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गोकुळने गोचिड निर्मुलन व थायलेरीया लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. यासाठी थायलेरीया लस संघाने मोफत उपलब्‍ध केली असून दूध उत्पादकांनी आपला गोठा, गोठ्यातील सर्व जनावरांचे गोचिड निर्मुलन व लसीकरण करून घेणेत यावे. तसेच संघाच्या सर्व पशुवैद्यकीय सेवासुविधांचा लाभ दूध उत्पादकांनी घेऊन दूध उत्पादन वाढीस सहकार्य करावे. ही मोहीम मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील गोकुळ संलग्न सर्व गावामध्ये राबविण्यात येणार असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी गोचिड निर्मुलन व थायलेरीया लसीकरणाचे व औषध फवारणीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

          यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, लालबहादूर दूध संस्थेचे चेअरमन वाय.सी.खोत, यशोधा महिला दूध संस्थेच्या चेअरमन सौ.मनिषा पताडे, भावेश्वरी दूध संस्था चेअरमन भास्कर खोत, गोकुळचे पशुसंवर्धन व्‍यवस्‍थापक डॉ.यु.व्‍ही.मोगले, राजू खोत, शिवाजी डोंगळे, संदीप ढेकळे, एल.के.खोत,अशोक खोत, द.ग.पताडे, युवराज सुतार,आर.डी.खोत, यशवंत खोत. शोभा खोत तसेच गावातील दूध संस्थांचे पदाधिकारी, दूध उत्पादक आदी उपस्थित होते.     

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

फोटो ओळ – यावेळी सामूहिक गोचिड निर्मुलन व मोफत थायलेरीया लसीकरण या सुरुवात प्रसंगी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, वाय.सी.खोत, सौ.मनिषा पताडे, भास्कर खोत, डॉ. यु.व्‍ही. मोगले, राजू खोत व गावातील दूध उत्पादक, अधिकारी आदि दिसत आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes