Awaj India
Register
Breaking : bolt
खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण* :वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडून विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा*वनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा. डॉ. के. प्रथापन* चुये येथे बेंदूर सण उत्साहात साजरावह्याची मदत गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी, आभाळा इतकी; डॉ. राजन गवसव्हनाळी उपसरपंचपदी संजयबाबा घाटगे गटाच्या अश्विनी जांभळे यांची निवडट्रिपलसीट व एकेरी मार्ग उल्लंघनावर दोन लाख रुपयांचा दंड वसूल भारत गौरव पर्यटन ट्रेन’चे कोल्हापूरात आगमन*सतेज पाटील यांच्या वाढदिवसाचे दातृत्व; गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचे कर्तुत्व वाडीपीर येथील जलजीवन मिशन; कोणी खाल्ले जास्त कमिशन

जाहिरात

 

गोकुळ संघाची चौफेर प्रगती – मागील चार वर्षांत गुंतवणूक, दूध दर व संकलनामध्ये अभूतपूर्व वाढ

schedule01 Jun 25 person by visibility 133 categoryउद्योग

कोल्हापूर, ता.०१ : गोकुळ दूध संघाने मागील चार वर्षांमध्ये पारदर्शक व उत्पादकाभिमुख धोरणांमुळे आर्थिक, प्रशासकीय आणि सामाजिक क्षेत्रात ठोस प्रगती साधली आहे. हे यश विश्वासार्ह व परिणामकारक कार्यपद्धतीचे प्रतिक आहे. खालील मुद्द्यांतून गोकुळ संघाची गेल्या चार वर्षांतील कार्यक्षमता, दूध उत्पादकांविषयी असलेली बांधिलकी आणि आर्थिक प्रगती सुस्पष्ट होते.
 
१. गुंतवणुकीत लक्षणीय वाढ – विश्वासाचे प्रतीक: दि. ३१ मार्च २०२१ अखेर गोकुळ संघाकडे एकूण गुंतवणूक / ठेवी रु. ३२२ कोटी इतक्या होत्या. मागील चार वर्षांत संघाने विविध धोरणात्मक निर्णय, पारदर्शक कारभार व उत्पादकाभिमुख कार्यपद्धती यामुळे रु. १९० कोटींची वाढ साधली असून, दि. ३१ मार्च २०२५ अखेर ही रक्कम रु. ५१२ कोटींवर पोहोचली आहे. ही वाढ ही केवळ आर्थिक यशाची नव्हे, तर हजारो दूध उत्पादक व संस्थांचा संघावर असलेला विश्वास व निष्ठा दर्शवते.
 
२. वास दूधावर न्याय निर्णय – उत्पादकांसोबत असलेली बांधिलकी : केंद्र शासनाच्या फूड सेफ्टी स्टँडर्ड कायद्यानुसार वासाचे अथवा भेसळयुक्त दूध हे बाजारात विक्रीस पुन्हा येऊ नये म्हणून नष्ट करणे बंधनकारक आहे. तथापि, गोकुळ संघाने केवळ कायदा बघितला नाही, तर उत्पादकांचे आर्थिक हित केंद्रस्थानी ठेवले. वासाच्या गायीच्या दुधाला प्रति लिटर २ रुपये व वासाच्या म्हशीच्या दुधाला प्रति लिटर ३ रुपये दरवाढ देऊन, योग्य मोबदला दिला गेला. या धोरणाचा मुख्य उद्देश म्हणजे उत्पादकांचे नुकसान टाळणे आणि त्यांना संघाकडे स्थिर राहण्यासाठी प्रोत्साहित करणे. येणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत यावर आणखी चर्चा करून दरवाढ करण्याचाही विचार केला जाणार आहे. संघाने नेहमीच स्वच्छ, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण दूध संकलनासाठी कार्य केले असून, भविष्यातही यावर भर राहील.
 
३. दूध दरवाढ – उत्पादकांसाठी अभूतपूर्व दिलासा : गेल्या चार वर्षांत गोकुळ संघाने उत्पादकांना उच्चांकी दूध दर तसेच अंतिम दूध दरफरक दिले असून गतसाली प्रतिदिनी १८.५० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण केला. संघाच्या म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमामुळे उच्चांकी म्हैस दूध संकलन या साली झाले. विशेषतः म्हैस दूधाच्या दरामध्ये सरासरी १२ रुपये प्रति लिटर वाढ तर गाय दूधाच्या दरामध्ये सरासरी ९ रुपये प्रति लिटर वाढ दिली आहे, गाय दुधाचे उत्पादन वाढल्यामुळे तसेच गाय दूध पावडर व लोण्याचे दर कमी झाल्यामुळे गाय दूध खरेदी कमी झाले होते त्यावेळी गोकुळच्या गाय दूध उत्पादकांना रुपये ३३ अधिक शासनाचे अनुदान रुपये ७ असे एकूण ४० रुपये इतका उच्चांकी दर हि काही कालावधीत मिळाला आहे. हि दरवाढ म्हणजे गोकुळ संघाने उत्पादकांना बाजाराच्या स्पर्धात्मक दरातही न्याय दिला आहे. यामुळे सद्या एप्रिल- मे या लीन कालावधीत संघाचे सरासरी दूध संकलन १५ लाख ५० हजार इतके राहिले आहे ते गतसालच्या संकलनाच्या तुलनेत जास्त आहे. प्रतिस्पर्धी दूध संघांनी दूध विक्री दरात वाढ केल्यानंतर संघालाही विक्री दरात वाढ करावी लागते. या दरवाढीसाठी व्यवसायिक दृष्टीकोन ठेऊन दुधाच्या खरेदी व विक्री दरातही वाढ होत असते.
 
४. दूध संकलन व सहकारी संस्थांचा वाढता सहभाग : गोकुळ संघास दुधाचा पुरवठा करणाऱ्या संस्था सहकारी संस्था कायद्यानुसार नोंदणी करून सभासद होतात. सन् २०२०-२१ मध्ये गोकुळ संघाचे दैनंदिन सरासरी दूध संकलन १२.२२ लाख लिटर होते. मागील चार वर्षांत हे संकलन ३.७२ लाख लिटरने वाढून १५.९४ लाख लिटर इतके झाले आहे. जुन्या संस्था संघाच्या पायाभूत रचनेचा भाग आहेत आणि आजही त्या संघाच्या यशात मोठा वाटा उचलत आहेत. नवीन संस्थांचा समावेश हा वाढती मागणी, दूध प्रक्रिया क्षमता आणि शेतकरी हित लक्षात घेऊनच केला जातो. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश दूध संस्थांचा गोकुळ वर दृढ विश्वास अल्यामुळे त्या गोकुळकडेच दूध संकलन करतात.
 
          यामुळे गतवर्षीच्या तुलनेत सर्व क्षेत्रात गुंतवणूक, दूध दर व संकलन, विक्री मध्ये अभूतपूर्व वाढ झाली असून हजारो सभासद, संस्था, लाखो दूध उत्पादक आणि गोकुळचे लाखो ग्राहक हे संघाच्या कार्यशैलीवर व नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेऊन आहेत, दूध उत्पादक, ग्राहक हीच गोकुळची खरी ताकद आहे.
 
- डॉ. योगेश गोडबोले
 
कार्यकारी संचालक, गोकुळ दूध संघ 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes