राजाराम रोड वरील परप्रांतीयांकडून स्थानिकांना त्रास
schedule20 Jan 24 person by visibility 234 category

कोल्हापूर :
बिंदू चौक ते राजाराम राजवाडा रोडवर परप्रांतीय यांनी अतिक्रमण केले आहे. या रोडवरून अंबाबाई दर्शनाला लाखो लोक ये -जा करत असतात. परप्रांतीय यांनी अतिक्रमण सुद्धा या ठिकाणीी केले असून स्थानिक नागरिकांना दारात येणे अवघड झाले आहे.
परप्रांतीय यांनी छोटी -छोटी गाडी लावून या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. भाविकांच्या सह स्थानिक नागरिकांना सुद्धा याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. वादावादी मध्ये स्थानिकांना परप्रांतीयाकडून अनेक वेळा मारहाण झाल्याची घटना सुद्धा समोर आली आहे.
या परिसरातील वयोवृद्ध स्थानिक नागरिक यांना सुद्धा बाहेर पडणे मुश्किल झाले आहे.राजाराम रोडवरील अतिक्रमण हटवून भाविक व स्थानिक नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांतून केली जात आहे.
एका माजी नगरसेवकाला या परप्रांतीच्या कडून आर्थिक लाभ होत असल्यामुळे भाविक व स्थानिक नागरिकांना मानसिक त्रासाचा तोटा होत आहे.