Awaj India
Register
Breaking : bolt
​इस्पुर्ली पोलिसांची धडक कारवाई; निगवे खालसा येथे अवैध हातभट्टी दारू अड्डयावर छापा, तिघांवर गुन्हा दाखल​स्वप्नपूर्ती जिल्हा सहकारी गृहतारण संस्थेकडून 'शैक्षणिक कर्ज योजना' सुरू; पालकांना मोठा दिलासाकोल्हापुरात “कॉकरोच जनता पार्टी”ला महाराष्ट्र बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा; २९ मे रोजी मेळावागोकुळ निवडणूक महायुती म्हणूनच लढणार; पक्षात कोणतीही फूट नाही – मंत्री हसन मुश्रीफगोकुळ निवडणुकीचे रणांगण तापले; सतेज पाटील यांचे दूध उत्पादकांना आवाहन,कोल्हापूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी (KMRDA) १ जून रोजी दसरा चौकात लाक्षणिक उपोषणश्रीमती सरस्वती तुकाराम यादव यांचे निधनजागतिक पर्यावरण दिनानिमित्त कृती फाउंडेशनतर्फे “पर्यावरण गौरव पुरस्कार” सोहळ्याचे आयोजनशिक्षकेतर कर्मचारी समायोजन विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार : राजेंद्र कोरेडॉ. शरद गायकवाड प्रबुद्ध इंटरनॅशनल संस्थेचा भिमस्फूर्ती पुरस्काराने सन्मानित

जाहिरात

 

समाजसेवेचा 'जागर': सौ. सुप्रिया शिंदे यांच्या कार्याचा गौरव; महिला सक्षमीकरणासाठी झोकून देऊन काम

schedule05 Mar 26 person by visibility 240 categoryलाइफस्टाइल

कोल्हापूर:
'जागर स्त्रीशक्ती सामाजिक कार्य' ग्रुपच्या अध्यक्षा सौ. सुप्रिया शिंदे यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यस्तरावर उमटवला आहे. महिला सक्षमीकरण, विधवा प्रथा बंदी आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी शेकडो महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत आजवर त्यांना विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
विविध पुरस्कारांनी सन्मानित
सौ. शिंदे यांच्या कार्याचा आलेख चढता राहिला असून, त्यांना मिळालेले काही प्रमुख पुरस्कार खालीलप्रमाणे आहेत:
कोरोना योद्धा समाज रत्न पुरस्कार (२०२२): स्व. चंद्रकांतदादा जाधव यांच्या हस्ते.
राज्यस्तरीय नवरत्न पुरस्कार (२०२३): ग्राहक पंचायत समितीमार्फत.
निर्भया वुमन एक्सलन्स अवॉर्ड (२०२३): माजी महापौर निलोफर आजरेकर यांच्या हस्ते.
यशस्वी सन्मान (२०२३): अरुंधती महाडिक यांच्या हस्ते.
राज्यस्तरीय स्त्री शक्ती पुरस्कार: अभिनेत्री अश्विनी महांगडे आणि GST आयुक्त वैशाली काशीद यांच्या हस्ते विविध सोहळ्यात सन्मान.
नारीशक्ती सन्मान (२०२३): आरटीओ हेड स्नेहा गिरी यांच्या हस्ते.
नुकतेच २०२४ मध्ये: शिवसेना युवा सेना, चंदू काका सराफ आणि TWJ कंपनीतर्फे सामाजिक रत्न व नवदुर्गा पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
सामाजिक उपक्रमांचा धडाका
केवळ पुरस्कारांपुरते मर्यादित न राहता, सौ. सुप्रिया शिंदे यांनी 'जागर स्त्रीशक्ती' ग्रुपच्या माध्यमातून प्रत्यक्ष जमिनीवर काम केले आहे:
स्वच्छता दूतांचा सन्मान: यावर्षी महिला दिनानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागातील ७० महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांच्या कष्टाचा गौरव करण्यात आला.
मदत कार्य: 'एकटी' निराधार संस्थेतील महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप आणि मिरजकर तिकटी येथील अंध शाळेतील मुलांना दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त खाऊ वाटप केले जाते.
वृद्धाश्रम सेवा: मातोश्री वृद्धाश्रम आणि सावली केअर सेंटर (पिरवाडी) येथे वाढदिवसानिमित्त उपक्रम राबवून जीवनावश्यक वस्तूंचा 'खारीचा वाटा' उचलला जातो.
प्रबोधन: महिला दिनानिमित्त बाईक रॅलीचे आयोजन करून समाजात स्त्री शक्तीचा जागर केला जातो.
महत्त्वाची पदे आणि जबाबदारी
त्यांच्या कामाचा आवाका लक्षात घेऊन त्यांची एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसद कोल्हापूर जिल्हा महिला संघटक पदी निवड झाली आहे. तसेच त्या महाराष्ट्र राज्य महिला विकास मंचच्या जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. 'लोकमत सखी मंच'च्या स्टार कमिटी मेंबर म्हणून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात त्यांनी सलग ८ वर्षे योगदान दिले आहे.
लघु उद्योग कार्यशाळा आणि विधवा प्रथा बंदी यांसारख्या संवेदनशील विषयांवर त्यांनी दिलेला लढा अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes