मानवांच्या दूरदृष्टीतून संविधानाने सर्व जीवांना अस्तित्वाचा अधिकार दिला – बबनराव शिंदे
schedule28 Nov 26 person by visibility 32 categoryराजकीय
संविधान दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाचा कार्यकर्ता मेळावा
कोल्हापूर : महामानवांच्या दूरदृष्टीतून निर्माण झालेल्या संविधानामुळे संपूर्ण विश्वातील मानव जातीसह प्राणीमात्रांनाही अस्तित्वासाठी जगण्याचा मार्ग, हक्क आणि अधिकार बहाल करण्यात आले आहेत. भारतीय संविधानाने प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला असून, संविधानातील लोकशाही मूल्यांचा अनुभव संपूर्ण मानवजात घेत आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बबनराव शिंदे यांनी केले.
संविधान दिनानिमित्त कोल्हापूर येथे आयोजित पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीतून आणि संकल्पनेतून अंमलात आलेली भारतीय राज्यघटना लोकशाही पद्धतीने संपूर्ण जगाला तारण्याचे काम करत आहे. संपूर्ण जग भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
संविधान दिनाचे औचित्य साधून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) पक्षाचा मेळावा घेण्यात आला. पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा कार्याध्यक्ष रमेश कांबळे (हुपरीकर) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पक्षामध्ये प्रवेश व परिचय करून देण्यात आला.
संविधान दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (गवई गट) मिस क्लार्क बोर्डिंगमध्ये मेळावा झाला. जिल्हा कार्याध्यक्ष र मे श कांबळे-हुपरीकर अध्यक्ष स्था नी होते.
ते म्हणाले, "महामानवांच्या दूरदृष्टीने संविधानामुळे विश्वातील मानवजातीसह प्राणिमात्रांनाही अस्तित्वासाठी
जगण्याचा मार्ग, हक्क, अधिकार बहाल केला आहे." मेळाव्यापूर्वी बिंदू चौकातील महामानवांच्या पुतळ्यांना मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक, शिंदे, बबनराव रानगे, कांबळे-हुपरीकर, भाऊसाहेब काळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. साताप्पा कांबळे-केर्लीकर, बाजीराव गायकवाड, संदीप हेर्लेकर, गीता कांबळे, शोभा कुमठेकर, मंगला वर्षे, कार्यकर्ते उपस्थित होते.