Awaj India
Register
Breaking : bolt
म्हैसूरच्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत कोल्हापूरचा डंका!*चांगल्या जीवनशैलीतून सामाजिक शांतता, राष्ट्रउभारणी शक्य – डॉ. बी. आर. कोरेभारतीय कर्मचारी संघ व भारतीय स्वाभिमानी संघाचे दुसरे महाराष्ट्र राज्य संमेलन २१ नोव्हेंबरलाडी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे यश कौतुकास्पद : ऋतुराज पाटीलमुलगा किंवा राजकीय व्यक्तींची स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती होणार नाही _ मुश्रीफ यांची स्पष्टोक्तीगोकुळ’ मध्‍ये वसुबारस निमित्‍त म्हैस व गाय-वासराचे पूजनअध्यक्षपदासाठी सतेज पाटील यांनी दोन संचालक द्यावेत; महायुतीची मागणीकोल्हापूरच्या विकासासाठी महापालिकेला भरघोस निधी उपलब्ध होईल-गडहिंग्लज तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत तातडीने समावेश करा*गोकुळच्या अध्यक्ष निवडीत लोकशाहीचा गळा घोटू नका; आमदार सतेज पाटील यांचे आवाहन

जाहिरात

 

म्हैसूरच्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत कोल्हापूरचा डंका!

schedule21 Nov 26 person by visibility 26 categoryक्रीडा

 पॅरा स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंची ऐतिहासिक कामगिरी; ४ रौप्य आणि ४ कांस्य पदकांची कमाई
कोल्हापूर : कर्नाटकातील म्हैसूर येथे आयोजित पहिल्या व्हीलचेअर पिकलबॉल नॅशनल चॅम्पियनशिप २०२६-२७ या राष्ट्रीय स्पर्धेत कोल्हापूरच्या परा स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोल्हापूरच्या खेळाडूंनी एकूण ४ रौप्य आणि ४ कांस्य पदके पटकावत राष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरचा नावलौकिक वाढविला आहे.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्र व्हीलचेअर पिकलबॉल संघात परा स्पोर्ट्स अकॅडमी, कोल्हापूरच्या संतोष रांजगणे, समर्थ निगवेकर, सुप्रिया तावडे आणि प्रशांत नारकर या चार खेळाडूंची निवड झाली होती. या खेळाडूंनी आपल्या जिद्दीच्या आणि उत्कृष्ट क्रीडाकौशल्याच्या जोरावर पदकांची कमाई केली.
खेळाडूंची पदकविजेती कामगिरी पुढीलप्रमाणे :
सुप्रिया तावडे – रौप्य पदक (वुमन्स स्टँडिंग)
संतोष रांजगणे – रौप्य पदक (व्हीलचेअर डबल्स)
प्रशांत नारकर – कांस्य पदक (मेन्स स्टँडिंग आणि मेन्स डबल्स)
समर्थ निगवेकर – रौप्य पदक (मेन्स स्टँडिंग)
पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडियाच्या मान्यतेने व्हीलचेअर पिकलबॉल फेडरेशन आणि कर्नाटक व्हीलचेअर पिकलबॉल फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशातील ११ राज्यांमधील तब्बल २२० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
या यशामागे खेळाडूंची मेहनत, जिद्द आणि चिकाटी यांच्यासोबतच त्यांना मिळालेल्या सुविधांचेही मोठे योगदान आहे. स्पोर्ट्स सेंटर कोल्हापूरचे संचालक सचित गांधी आणि व्यवस्थापिका मयुरी पाठक यांनी दिव्यांग खेळाडूंना सरावासाठी पिकलबॉल डोममध्ये मोफत कोर्ट उपलब्ध करून दिले. तसेच दोन महिने मोफत प्रशिक्षणाची सुविधाही दिली.
विशेष म्हणजे व्हीलचेअरवरून येणाऱ्या खेळाडूंना सराव करताना अडचण येऊ नये, यासाठी पिकलबॉल डोममध्ये अडथळामुक्त प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली. दिव्यांग खेळाडूंना केवळ सहानुभूती न दाखवता त्यांना प्रत्यक्ष संधी, सुविधा आणि प्रोत्साहन देण्याचे काम स्पोर्ट्स सेंटरने केले. या सहकार्यामुळेच खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळाली.
या खेळाडूंना परा स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष संतोष रांजगणे, उपाध्यक्ष विष्णुपंत पाटील, सचिव जानकी मोकाशी तसेच कांचन चौगुले, सचिन घाटगे, सुप्रिया तावडे, विकास चौगुले आणि किशोर तावडे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
राष्ट्रीय स्तरावर पदकांची कमाई करणाऱ्या या खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे. दिव्यांगत्वावर मात करून जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, हे कोल्हापूरच्या खेळाडूंनी आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे. त्यांच्या या यशामुळे परा स्पोर्ट्स अकॅडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes