Awaj India
Register
Breaking : bolt
विद्या मंदिर पणोरे येथे संविधान दिन उत्साहात साजराजिल्हा परिषदेत स्वीकृत सदस्यपदी नियुक्तीची वसंत चांदुरकर यांची मागणीकास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे २५ नोव्हेंबर रोजी मुंबईत एकदिवसीय धरणे आंदोलनम्हैसूरच्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत कोल्हापूरचा डंका!*चांगल्या जीवनशैलीतून सामाजिक शांतता, राष्ट्रउभारणी शक्य – डॉ. बी. आर. कोरेभारतीय कर्मचारी संघ व भारतीय स्वाभिमानी संघाचे दुसरे महाराष्ट्र राज्य संमेलन २१ नोव्हेंबरलाडी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे यश कौतुकास्पद : ऋतुराज पाटीलमुलगा किंवा राजकीय व्यक्तींची स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती होणार नाही _ मुश्रीफ यांची स्पष्टोक्तीगोकुळ’ मध्‍ये वसुबारस निमित्‍त म्हैस व गाय-वासराचे पूजनअध्यक्षपदासाठी सतेज पाटील यांनी दोन संचालक द्यावेत; महायुतीची मागणी

जाहिरात

 

विद्या मंदिर पणोरे येथे संविधान दिन उत्साहात साजरा

schedule28 Nov 26 person by visibility 47 categoryराजकीय

 

पणोरे : विद्या मंदिर पणोरे येथे आज २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन व शपथ घेण्यात आली. प्रसिद्ध व्याख्याते श्री. गौरव पणोरेकर
(शिव , फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ विचार) यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास गावचे लोकनियुक्त सरपंच श्री. मारुती पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. नवनाथ सुतार, गावातील मान्यवर, शिक्षकवर्ग व मुख्याध्यापक श्री. कबीरदास भीमराव भुरके उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. संदीप ज्योतीराम बाटे यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती ताई व्हनाले यांनी केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes