Awaj India
Register
Breaking : bolt
डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निक येथे वाचन संवाद उपक्रम*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठ संघात निवडशैक्षणिक -औद्योगिक दरी दूर होईल- बॉबी क्यूरॅकोससीपीआरमधील फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तात्काळ सादर करा : आमदार राजेश क्षीरसागरडि. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ''नॅक"कडून मानांकन* डॉ.डी वाय पाटील पॉलिटेक्निक मध्ये बजाज कंपनीच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न डॉ. सुनील जे. रायकर यांचे 3डी प्रिंटिंगवर व्याख्यानचंदगड तालुक्यात विहिरीचे पैसे पाण्यातहोय, मी भांडी घासतोय!पोपट पवार,सर्जेराव नावले,शेखर पाटील,आदित्य वेल्हाळ,सचिन सावंत, नयन यादवाड यांना कोल्हापूर प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर

जाहिरात

 

शाळेसाठी तिची तब्बल सोळा किलोमीटर पायपीट: दहावीला मिळवले 88.20% इतके गुण

schedule21 Jun 22 person by visibility 1028 categoryशैक्षणिक


पावनखिंड -आवाज इंडिया प्रतिनिधी

पांडुरंग सोनू कांबळे
…...................    .
एखाद्या दिवशी स्कुलबस चूकली तर शहरातील मुलं शाळेला हमखास दांडी मारतात. मात्र शाहूवाडी तालुक्यातील ईजोली पैकी धनगरवाडा येथील साक्षीने दररोज 16 किलोमीटर पायपीट करत दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले आणि आणि एकूण 88.20% टक्के मार्क मिळवले. तिच्या या यशाबद्दल परिसरात तिचे कौतुक केले जात आहे.


 सखाराम गावडे या शेतमजूराच्या साक्षी या मुलीने दररोज शाळेसाठी सोळा किलोमीटरची पायपीट केली. तिला आता या संघर्षाच फळ मिळालं आहे. दहावी परीक्षेत 88.20% गुण मिळवले. ज्या शाळेत साक्षी शिकली तिथल्या इतर विद्यार्थ्यांना सोडायला पालक येत असत काही विद्यार्थी स्वतः गाडी घेऊन येत असत तर काही एसटी आणि वडाप ने शाळेतपर्यंत येत असत साक्षी मात्र त्याला अपवाद होती ती दररोज जाताना आठ किलोमीटर येताना आठ किलोमीटर पायपीट करत येत होती.

सभोवतालच्या वातावरणात साक्षी कधीच गुंतून पडली नाही. त्यामुळेच अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतील हे यश शिक्षकांसाठी आणि तिच्या आई-वडीलासाठी अभिमानास्पद आहे. कोणत्याही शिकवणीशिवाय तिने मिळवलेले यश हे प्रेरणादायी आहे. याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 घरची परिस्थिती बेताची असताना देखील जिद्द, चिकाटीच्या बळावर आपले गुणवत्ता सिद्ध केली. दहावी परीक्षेत जसे संघर्षातुन यश संपादन केले त्याचप्रमाणे 12वीला देखील भरगोस गुणांनी उत्तीर्ण होईल असे आवाज इंडिया लाईव्हशी बोलताना सांगितले. 

अडथळ्यावर मात करत तिने यशाचा पहिला टप्पा गाठला आहे. तिला भविष्यात डॉक्टर होऊन खेड्यापाड्यातील लोकांची सेवा सुविधा पूरवायच्या आहेत. पावसाळ्यात शाळेत जाताना खूप अडचणी यायच्या मोठा पाऊस झाला की गावातून एक ओढा व्हायचा, लाकडी पुलावरून दोरीला पकडत पकडत जीव मुठीत धरून शाळेला जायला लागत असे. पुलावर पाणी आले की शाळेचा खाडा व्हायचा. वादळी वारा, दमदार पाऊस, बत्तीही गुल असायची, यामुळे फोन करायलाही नेटवर्क सेवा ही सुरळीत नसायची शिक्षकांसोबत संपर्क होत नसल्याने शैक्षणिक नुकसान व्हायचे असे साक्षीने सांगितले.

वडील सखाराम गावडे यांचा जगण्यासाठीचा रोजचा संघर्ष जणू पाचवीलाच पूजलेला. त्यात त्यांना चार आपत्य. घरी गाई -म्हैस यांच्या दुधातुन येणाऱ्या पैश्यातुन घर चालते. अशा परिस्थितीत साक्षी ने जिद्द सोडली नाही. तिला शिक्षक ही तिला खुप मदत करायचे. ईजोली धनगरवाडा ते करंजफेण ये-जा करून दररोजी 16किलोमीटर ची डोंगरवाट, जंगलातुन पायपीट करून न्यू इंग्लिश स्कुल करंजफेण येथे माध्यमिक शिक्षण घेण्यासाठी अनवाणी जात असत. आईवडील अशिक्षित असतानाही साक्षीने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे. म्हणतात ना "मंझीले उन्ही को मिलती हैं, जिनके सपनो मे जान होती हैं
यू ही पंख होनेसे कुछ नही होता होसलोसे उडान होती हैं ! हेच साक्षीच्या यशातुन पुन्हा एकदा अधोरेखित झाल आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes