०९/०१/२०२४
*
भारतीय जनता पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोचवून, पक्षाची ताकद वाढवण्यासाठी युवा मोर्चाच्या पदाधिकारी, कार्यकारिणी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. भाजप युवा मोर्चासाठी कोल्हापूर ग्रामीण पश्चिम विभागाच्या नुतन कार्यकारिणी पदाधिकार्यांना नियुक्ती पत्र प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्षाशी संलग्न सेलच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांची निवड केली जातीय. त्यातून दुसर्या आणि तिसर्या फळीत काम करणार्या कार्यकर्त्यांना चांगली संधी मिळत असल्याने, भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. शनिवारी भाजप युवा मोर्चा कोल्हापूर ग्रामीण पश्चिम विभागाच्या नुतन कार्यकारिणी पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात आली. धिरज करलकर यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या भाजप युवा मोर्चासाठी, सदस्यांसह जिल्हा सरचिटणीस, चिटणीस, सदस्य, कोषाध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली. शेखर चौगुले यांच्यासह २३ उपाध्यक्ष, १३ चिटणीस, २५ सदस्य अशी जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. कोषाध्यक्षपदी साईराज कावणेकर यांची नियुक्ती करण्यात आली. या सर्वांना खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते नियुक्ती पत्रं प्रदान करण्यात आली. आगामी लोकसभा निवडणूकीत ४०० पेक्षा अधिक जागा जिंकून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा पंतप्रधान करायचे आहे. हे स्वप्न साकार होण्यासाठी भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांनी सक्रीय रहावं, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले. यावेळी राहूल देसाई, शिवाजी बुवा, सुशिला पाटील, अजिय चौगले, बी एस पाटील, मंदार परितकर, दत्तात्रय मेडशिंगे, बाळ केसरकर, अनिल तळकर, दिग्वीजय देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.