कोल्हापूर प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर संतेष पाटील, बी.डी. चेचर, विजय केसरकर, निलेश शेवाळे पुरस्काराचे मानकरी
schedule07 Jan 24 person by visibility 128 categoryराजकीय

सुधारित....
कोल्हापूर,दि.५(प्रतिनिधी)
कोल्हापूर शहरातील पत्रकाराची मातृसंस्था असणार्या कोल्हापूर प्रेस क्लब,कोल्हापूर च्या वतीने मराठी पत्रकार दिनानिमित्त देण्यात येणारे सन २०२३ चे पुरस्कार आज जाहीर करण्यात आले.या पुरस्कारा मध्ये मुद्रित माध्यामतून दै. तरुण भारत संवादचे संतोष पाटील यांना उत्कृष्ठ पत्रकार, तसेच दै.सकाळचे बी.डी.चेचर यांना उत्कृष्ट छायाचित्रकाराचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून एबीपी माझाचे विजय केसरकर यांना उत्कृष्ट पत्रकार, एबीपी माझाचे कॅमेरामन निलेश शेवाळे यांना उत्कृष्ट कॅमेरामन पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे आणि सर्व संचालक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते.यावर परीक्षकांनी दिलेल्या निर्णया - नुसार हे पुरस्कार जाहीर करण्यात आले.जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, शिवाजी विद्यापीठाचे प्रसिद्धी प्रमुख डॉ.अलोक जत्राटकर, जेष्ठ पत्रकार संजय पाटोळे, संजय देसाई,संजय देवरुखकर,सरदार करले, संदीप कारेकर,अजय कुरणे आणि मकरंद लिंगनूरकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. लवकरच एका शानदार कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याचे कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर,सचिव बाबुराव रानगे, अधिस्वीकृती समितीचे कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष सुखदेव गिरी, समीर मुजावर,अश्विनी टेंबे, शिवाजी यादव,नंदिनी नरेवाडी, मिथुन राज्याध्यक्ष,संग्राम काटकर आदी पदाधिकारी,संचालक,पत्रकार, छायाचित्रकार,कॅमेरामन उपस्थित होते.