शिक्षक समिती व समन्वय समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
कोल्हापूर /मारुती फाळके
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षक, केंद्रप्रमुखांची रिक्त पदे त्वरित भरा, शिक्षकांना शाळेत शिकवू,लेकरांना शिकू द्या,दररोज नवीन माहिती अशा अशैक्षणिक कामाचा भडिमार बंद करा अशा शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुसळधार पावसात न्याय्य मागण्यांचा आंदोलनातून एल्गार केला.
शिक्षकांच्या मागण्या सोडविण्यासाठी शासन पातळीवर कोणतीच कारवाई होत नाही. कोरोना संक्रमण काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शिक्षक कटिबद्ध असताना शासन स्तरावरून अनेक शैक्षणिक कामांचा दररोज नव्याने भडीमार केला जात आहे, एकीकडे शिक्षकांची पदे रिक्त आहेत, केंद्रप्रमुख यांची ७०%टक्के पदे रिक्त आहेत याचा भार जिल्ह्यातील अनेक शिक्षकांकडे आहे. आणि वरून दैनंदिन अध्ययन अध्यापन प्रक्रिया बाधित करणाऱ्या कागदपत्रांचा भडिमार दिवसेंदिवस होत आहे. या विषयाबाबत शिक्षकाच्या भावनांची दखल घेतली जात नाही हे वेदनादायक वास्तव आहे.
राज्यात १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या शिक्षक कर्मचारी- अधिकाऱ्यांना राजस्थान, छत्तीसगड आणि दिल्ली राज्यात धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत शासनाची भूमिका नकारात्मक आहे म्हणून या आणि अन्य मागण्यासाठी आंदोलनाचा सनदशीर प्राथमिक टप्पा म्हणून महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक समितीने काल सोमवार दि.८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.यामध्ये शेकडो शिक्षक सहभागी झाले होते. या आंदोलना दरम्यान "शिक्षकांना शिकवु द्या,मुलांना शिकू द्या", 'मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शैक्षणिक कामे कितीही द्या' हे फलक चर्चेचे ठरले.
यावेळी बोलताना शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अर्जुन पाटील म्हणाले,अशैक्षणिक कामे बंद करून शिक्षकांना फक्त ज्ञानदानाचे काम द्यावे, मुख्यालयी राहणे, M S CIT सारखे प्रश्न तत्काळ सोडवावेत.शिक्षकाकडून वेगळी माहिती संकलित करण्याचे काम तात्काळ बंद करावे.
यावेळी शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद तौदकर म्हणाले,मा. मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं प्रत्येक शाळेत शिक्षकांचे phto लावावेत, we are not wanted,we are needed, आम्ही चोर नाही आहोत ,आम्ही समाजाची गरज आहे म्हणून आहोत,जे कोण दांडी बहाद्दर असतील त्याना प्रशासकीय यंत्रणे मार्फत बडतर्फ करा,शिक्षक समिती यात अजिबात हस्तक्षेप करणार नाही पण आमचा पवित्र शिक्षकी पेक्षा बदनाम करू नका
शिक्षकांचे रिक्त पदे त्वरित भरा, शिक्षकांना शिकवू द्या, लेकरांना शिकू द्या, शिक्षकांना अशैक्षणिक कामे लावू नका, प्रशिक्षणाचा भडीमार करू नका अशा घोषणा देत प्राथमिक शिक्षकांनी जिल्हाधिकारी परिसर दणाणून सोडला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात शिक्षकांनी भर पावसात आंदोलन केले. वर्गात गुरुजींचे फोटो लावण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावित निर्णयाला विरोध करताना प्राथमिक शिक्षकांनी "वर्ग सात -शिक्षक दोन मग इतर वर्गात फोटो लावणार कुणाचे "असा उपरोधिक टोलाही राज्य सरकारला लगावला. दुपारी अडीच ते सायंकाळी पाच या वेळेत आंदोलन करत शिक्षण विभागाचे व सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. शिक्षकांच्या शिष्टमंडळाने, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवतिके यांना मागण्यांचे निवेदन दिले.
दरम्यान जिल्हा शिक्षक समन्वय समिती, शिक्षक संघ थोरात गट, महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना कास्ट्राईब,यानीही या आंदोलनात सहभागी झाला. दरम्यान सरकार शिक्षकांच्या मागणीकडे कधी लक्ष देणार ? प्रलंबित मागण्यांची पूर्तता कधी करणार ? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
प्राथमिक शाळेतील शिक्षकांची सर्व रिक्त पदे तत्काळ भरावेत, अशैक्षणिक कामे बंद करावेत, जिल्हा अंतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्या तातडीने सुरू कराव्यात, वेतन एक तारखेला करावे यासह शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी शिक्षक समितीच्या नेतृत्वाखाली आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पुकारले होते. त्यानुसार कोल्हापुरात झालेल्या आंदोलनात शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष व शिक्षक बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील, महिला राज्याध्यक्षा वर्षा केनवडे, समितीचे जिल्हा सरचिटणीस प्रमोद तौंदकर, राज्य कार्यकारणी सदस्य ज्योतीराम पाटील, जिल्हा नेते कृष्णात कारंडे, रवळू पाटील,राजेश सोनपराते, सुधाकर सावंत, जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी चेअरमन राजीव परीट, शिक्षक बँकेचे संचालक राजेंद्र पाटील,सुरेश कोळी, रामदास झेंडे, शिवाजी बोलके, हरिदास वरणे, उमेश देसाई, शरद केनवडे, संदीप मगदूम, कोल्हापूर समितीचे कोल्हापूर शहराध्यक्ष संजय पाटील संजय कडगावे उत्तम गुरव, युवराज सरनाईक, नयना बडकर, सुनील पाटील, दिलीप गायकवाड,बळवंत शिंत्रे,शंकरराव मनवाडकर,राजेश सोनपराते,सुधाकर सावंत,सतीश तेली,मधुकर मुसळे,हरिदास वर्णे, शरद केनवडे,ओमाजी कांबळे, उमेश देसाई,तुकाराम मातले,सुरेश पाटील,संजय चाळक,बळवंत पोवार, संजय कुंभार,धनाजी पाटील,अनिल भस्मे,एकनाथ आजगेकर, गणपती मांडवकर,धोंडीराम खोंगे, अरविंद पाटील,जुनी पेंशन संघटनेचे मंगेश धनवडे,बालाजी पांढरे,आदींचा सहभाग होता. समन्वय समिती व शिक्षक थोरात गटाचे जिल्हाध्यक्ष रवी पाटील, जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील, शिक्षक बँकेच्या व्हाईस चेअरमन पद्मजा मेढे, संचालक एस. व्ही. पाटील, शिवाजी रोडे पाटील, बाळासाहेब निंबाळकर, बाळकृृष्ण हळदकर, अमर वरुटे, कास्ट्राईब संघटनेचे,शिक्षक बँकेचे संचालक गौतम वर्धन, बाळू परीट, रामदास झेंडे,शिवाजी बोलके आदींचा सहभाग होता.