पोपट पवार,सर्जेराव नावले,शेखर पाटील,आदित्य वेल्हाळ,सचिन सावंत, नयन यादवाड यांना कोल्हापूर प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर
schedule04 Jan 25 person by visibility 137 categoryलाइफस्टाइल
कोल्हापूर,दि.४(प्रतिनिधी) आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी मराठी पत्रकार दिनानिमित्त कोल्हापूरातील पत्रकारांची मातृसंस्था असलेल्या कोल्हापूर प्रेस क्लबच्यावतीने देण्यात येणारा २०२४ चा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार पोपट पवार (लोकमत),
उत्कृष्ट उपसंपादक सर्जेराव नावले, (दैनिक सकाळ),इलेक्ट्रॉनिक मिडियातील उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार शेखर पाटील (पुढारी न्यूज), उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार आदित्य वेल्हाळ (लोकमत), उत्कृष्ट कॅमेरामन सचिन सावंत,(साम टीव्ही) आणि उत्कृष्ट डिजिटल मिडीया प्रतिनिधी नयन यादवाड (महाराष्ट्र टाइम्स) यांना शनिवारी जाहीर झाला. अध्यक्ष शीतल धनवडे यांनी पत्रकार परिषदेत या पुरस्कारांची घोषणा केली.रोख रक्कम, स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असून लवकरच एका शानदार समारंभात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार असल्याचे अध्यक्ष धनवडे यांनी सांगितले.
सन २०२४ सालातील उत्कृष्ट पत्रकार,छायाचित्रकार,इलेक्ट्रॉनिक मिडिया प्रतिनिधी,कॅमेरामन तसेच उपसंपादक आणि डिजिटल मिडीया पुरस्कारसाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते.जेष्ठ पत्रकार दिलीप लोंढे, संजय पाटोळे,मनोज साळुंखे, चारूदत जोशी,कृष्णात जमदाडे, संजय देसाई,राजा उपळेकर, मोहसीन मुल्ला तसेच जिल्हा माहिती अधिकारी सचीन अडसुळ आदी तज्ज्ञ परीक्षकांनी या प्रस्तावाचे परीक्षण करुन पुरस्कारर्थींची निवड केली.
यावेळी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष प्रशांत आयरेकर,सचिव बाबुराव रानगे, दीपक जाधव,भूषण पाटील आदी उपस्थित होते.