Awaj India
Register
Breaking : bolt
कामगिरी दाखवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा’ जि.प प्रशासनाला इशाराडी. वाय. पाटील फार्मसीची अपेक्षा वक्तृत्व स्पर्धेत प्रथमशिक्षकांच्या कमतरतेवर जिल्हा परिषद सदस्यांचा मदतीचा हातके. एम. सी कॉलेज मध्ये "भू पर्यावरणीय दिन आणि संकल्पना" या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न....डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या तर राज्यात तिसऱ्या स्थानी*‘तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा’चा संदेश; प्राची माळीने नेत्रदानातून दिली प्रेरणामहायुतीच्या नेत्यांनो, आश्वासन लक्षात आहे काय?पाईपलाईन गळतीकडे महापालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्षसंघर्ष, जिद्द आणि प्रेम यांचा सुंदर संगम म्हणजे श्रद्धा देवदत्त माने!अनाथ मुलींशी लग्नाचे आमिष दाखवून तरुणांची लूट;

जाहिरात

 

राहूल रेखावार यांचेवर गुन्हा दाखल करा

schedule08 Jun 25 person by visibility 655 category

आपघातास कारणीभूत ठरले प्रकरणी राहूल रेखावार यांचेवर गुन्हा दाखल  करा
कोल्हापूर ;
सर्व प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीची मागणी 
कोल्हापूर दि. ०८ : वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणास वेळेत पोहचण्यासाठी जाणाऱ्या शिक्षकांचा आज चिपळूण रत्नागिरी येथे अपघात झाला. या अपघातास कारणीभूत ठरले प्रकरणी  राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण संस्थेचे राहूल रेखावार यांच्यावर गुन्हा दाखल करून  त्यांना संचालक पदावरून हकालपट्टी कारवाई करावी अशी मागणी सर्व प्राथमिक शिक्षक संघटना कृती समितीचे  यांनी केली आहे.
      अपघाताची बातमी समाज माध्यमातून समजतात न्यू हायस्कूल येथे सुरू असलेल्या वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण स्थळी  जेवणाच्या सुट्टीच्या वेळेत एकत्रित येत सर्व शिक्षकांनी राहुल रेखावार यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. " अपघातास कारणीभूत ठरले प्रकरणी राहुल रेखावार यांच्यावर गुन्हा दाखल करा...! राहुल रेखावल यांची संचालक पदावरून हकलपट्टी करा...! " अशा घोषणा देत शिक्षकांनी परिसर दणाणून सोडला.
      रियल टाईम प्रशिक्षणाच्या नावाखाली शिक्षकांना  सकाळी ९:३० वेळेत उपस्थित राहण्याची सक्ती केली आहे. ऑनलाईन उपस्थिती वेळेत न नोंदवल्यास त्या शिक्षकांचे प्रशिक्षण रद्द केले जाते. राज्यात अनेक केंद्रावर अनेक शिक्षकांचे प्रशिक्षण रद्द झाले आहे.
     आज रत्नागिरी येथील प्रशिक्षणासाठी वेळेत पोहचण्यासाठी निघालेल्या शिक्षकांच्या मिनी बसचा गंभीर अपघात झाला. या या बसमधून 25 पेक्षा जास्त शिक्षक प्रशिक्षण स्थळी पोहोचण्यासाठी प्रवास करत होते. यातील सहा ते सात शिक्षकांना गंभीर दुखापती झाल्या आहेत.
        अपघाताची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक राहूल रेखावार यांच्यावर निश्चित करून त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची संचालक पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी सर्व शिक्षक संघटना प्रमुखांनी केली. यावेळी संघटना कृती समितीचे भरत रसाळे,राजेंद्र कोरे, सुधाकर सावंत, संतोष आयरे संजय पाटील सुरेश कांबळे  सुभाष धादवड सुनील पाटील इत्यादी उपस्थित होते.
.......................
 रियल टाईम प्रशिक्षणामध्ये एक ही रियल टाईम चाचणी परीक्षा झाली नाही. कोणत्याही चाचणी परीक्षेचे लिंक ओपन झाली नाही. रियल टाईम प्रशिक्षणाचा खज्जा उडाला.
.......................
 या प्रशिक्षणासाठी शिक्षकांकडून दोन हजार रुपये इतके शुल्क भरून घेण्यात आले आहे जवळजवळ आठ ते नऊ कोटीचा निधी यातून जमा झाला आहे. पण या प्रशिक्षणात शिक्षकांना चहा भोजन कोणत्याही सुविधा पुरविलेल्या नाहीत.
....................
 कोल्हापूरतील 29 हून अधिक शिक्षक प्रशिक्षणातून बाहेर. ऑनलाइन हजरीला पाच मिनिटं वेळ झाल्याचे कारण देत या शिक्षकांना प्रशिक्षणातून लिव्ह करण्यात आले आहे.
.................

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes