Awaj India
Register
Breaking : bolt
करवीरचे माजी तहसील स्वप्नील रावडे, शिवाजी पोवार आदींनी संगनमताने ६५० कोटींचा माल लांबवला लाठीमाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहनडी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला* *'अधिकार प्रदत्त स्वायत्त महाविद्यालय' दर्जा*साखर उद्योगाच्या शाश्वत विकासासाठी* *उपपदार्थांचे मूल्यवर्धन गरजेचे*अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराबाबत कुटुंब आणि समाजाची जबाबदारी प्रज्वल दिलीप पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजनसवतकडा धबधबा परिसरात एडव्हेंचर स्पोर्ट्सचा विस्तार; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण*शाळेतील मुलांचा आहार असा असावा बबनराव शिंदे यांना 'लोकराजा शाहू कोल्हापूर भूषण पुरस्कार' प्रदानऐतिहासिक माणगाव जिल्हा परिषद शाळेला कोल्हापूर जि.प. पदाधिकाऱ्यांची भेट

जाहिरात

 

*कोल्हापुरच्या विकासात राजाराम महाराजांचे मोठे योगदान - आमदार ऋतुराज पाटील*

schedule31 Jul 24 person by visibility 461 category

कोल्हापूर :
राजर्षी शाहूंच्या विचाराचा वारसा राजाराम महाराजांनी पुढे नेला. कोल्हापूरच्या विकासात त्यांचे फार मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. कसबा बावडा येथील राजाराम बंधारा ग्रुपच्यावतीने आयोजित राजाराम महाराजांच्या 127 व्या जयंती कार्यक्रमात आमदार ऋतुराज पाटील बोलत होते.

   राजाराम बंधाराच्या ठिकाणी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह, मान्यवरांनी राजाराम महाराजाना अभिवादन केले.यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी, राजर्षी शाहू महाराजांनी रयतेच्या कल्याणाचे जे विविध उपक्रम राबवले होते ते राजाराम महाराजांनी पुढे चालू ठेवले. राजाराम महाराजांनी कोल्हापूराच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, शेती, औद्योगिक, आणि सहकाराच्या विकासासाठी प्रयत्न केले. क्रीडा, नाट्य सृष्टी, सिने सृष्टी साठीही त्यांनी राजाश्रय दिला. त्यामुळे कोल्हापूरच्या विकासात त्यांचे फार मोठे योगदान आहे. राजाराम महाराज यांचे नाव कोल्हापूरच्या जनतेच्या स्मरणात चिरंतन राहील.

   राजाराम बंधारा ग्रुपने यानिमित्त घाट स्वच्छता, रक्तदान वृक्षारोपण सारखे विविध उपक्रम राबविले. यावेळी माजी नगरसेवक सुभाष बुचडे, मोहन सालपे, श्रीराम सोसायटीचे उपसभापती दत्ता मासाळ, संचालक मिलिंद पाटील, सुभाष गदगडे, विद्यानंद जामदार, राहुल माळी, मानसिंग जाधव, ज्ञानेश्वर मंडपाचे अध्यक्ष तानाजी चव्हाण, राजाराम बंधारा ग्रुपचे प्रा. डॉ. लक्ष्मण करपे, जितेंद्र केंबळे, राजाराम बंधारा ग्रुपचे कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes