कोल्हापूर
जिल्हा परिषद कोल्हापूर विविध उपक्रमात राज्यात अग्रेसर असली तरी काही कामात गोंधळ असल्याचा दिसून येतो. येथील बांधकाम विभागात आरेखक पाहतो अभियंताचे काम; दोन अब्ज 70 कोटी कामात 50 लाखांच्या भ्रष्टाचारावर ठाम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याकडे सर्वच वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्याने दहावी पास आरेखक चक्क शाखा अभियंताचे काम करत असल्याचे दिसत आहे.
हा कर्मचारी रेखाशाखेतील रस्ते विषयक नोंदी अध्यायावत करणे हे त्यांचं काम असतं. मात्र,वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वरदहस्त मिळाल्यामुळे आरेखक शाखा अभियंता या ठिकाणी तळ ठोकून आहे. चुकीचे प्रस्ताव आणि अनधिकृत प्रस्ताव मंजूरकरून शासनाची चक्क फसवणूक केलेली आहे, 25/ 15 मध्ये मूलभूत सुविधा अंतर्गत कामे कागदपत्राशिवाय मंजूर करणे, ग्रामपंचायत मालमत्तेच्या ऐवजी खाजगी जागेत कामाचे प्रस्ताव मंजूर करणे काही कामे एकाच रस्त्यावर तीन वेळा पूर्ण केली आहेत.
जिल्ह्यातील निम्म्यापेक्षा अधिक गावात या महाशयाने चुकीचे प्रस्ताव मंजूर करून दिले आहेत.या कामाची कागदपत्रे वेगळे आहेत.काम तिसऱ्याच ठिकाणी झाले असल्याचं चित्र आहे. ह्या कामासाठीच त्यांनी जवळजवळ 50 लाखापेक्षाअधिक कामात गैरव्यवहार केला असल्याचं दिसत आहे.
याबाबत वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता त्यांची नेमणूक तिथे नाही.असे सांगून उडवा उडवीची उत्तर दिली जात आहेत.