कोरोना पॉझिटिव रिपोर्ट येऊनही काम सुरूच
schedule18 Jul 20 person by visibility 2400 categoryआरोग्य
दोनशे कर्मचाऱ्यांच्या मध्ये घबराट
कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कोल्हापूर येथील ताराबाई पार्क विभागीय कार्यशाळेत कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला असल्याची चर्चा आहे. तरीही कार्यालय सुरू असल्याने दोनशे कर्मचाऱ्यांचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर पडला आहे.
या कार्यशाळेतील इंजिन विभागात कार्यरत असणारा युवक त्याचा रिपोर्ट पॉझिटिव आला असल्याची चर्चा आहे. काही दिवसापूर्वी तो पुण्यातून आला असल्याचे सांगितले जातं. त्याचा रिपोर्ट आज पॉझिटिव आल्याने विभागीय कार्यशाळेत गोंधळ निर्माण झाला आहे. काम कसं करायचं त्याच्या सहवासातील पंधरा जण इतर पावणेदोनशे जणांच्या सहवासात आले नसतील का अशी भीती येथील कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झाली आहे. विभागीय कार्यशाळेतील अधिकारी जोशी जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेशाची वाट बघत असल्याचे कर्मचाऱ्याने सांगितले. तोपर्यंत आमचा जीव जाऊदे का असाही प्रश्न काही कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.