Awaj India
Register
Breaking : bolt
लोककलांतून उलगडला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपटजुन्याप्रमाणे संच मान्यता चालू ठेवली नाही तर ; गुलाम शिक्षण पद्धतीतून निर्माण होतीलवसा पारंपारिक लोक संस्कृतीचा'" या कार्यक्रमाचे आयोजनसाळोखेनगर डी. वाय.पी.मध्ये रक्तदान शिबिर संपन्नराज्य राखीव पोलीस वर्धापन दिनानिमित्त संचलन परेड सोहळा उत्साहात*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या राज निकमची* *बल्गेरिया येथे रिसर्च इंटर्नशिपसाठी निवड*महिलांनी अन्यायाविरुद्ध लढावे अन्याय करू नये; अनुराधा भोसलेकल्पना मंथन देसाई यांना आदर्श महिला पुरस्कारजयश्री अशोक कुरबेट्टी यांना आदर्श महिला पुरस्कारमनाली सुनील मंडालकर यांना आदर्श महिला पुरस्कार

जाहिरात

 

डॉ. सुनील जे. रायकर यांचे 3डी प्रिंटिंगवर व्याख्यान

schedule12 Jan 25 person by visibility 163 categoryशैक्षणिक

*डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या डॉ. सुनील जे. रायकर यांचे* 
*आंतरराष्ट्रीय परिषदेत 3डी प्रिंटिंगवर  प्रमुख वक्ता म्हणून व्याख्यान*

कसबा बावडा/
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महविद्यालयांच्या मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. सुनील जे. रायकर यांनी  रीसेंट अ‍ॅडव्हान्सेस इन मटेरियल्स अँड मॅन्युफॅक्चरिंग  (ICRAMM 2024) या सहाव्या  आंतरराष्ट्रीय परिषदमध्ये प्रमुख वक्ता म्हणून भाषण दिले. ही परिषद 30 - 31 डिसेंबर 2024 दरम्यान, तामिळनाडूच्या इरोड येथील वेलालर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग  अँड टेक्नॉलॉजी येथे झाली. 

डॉ रायकर यांनी  "पॉलीमर-आधारित अ‍ॅडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगचे भविष्य: मटेरियल इनोव्हेशन्स आणि स्लायसिंग तंत्रज्ञान" या विषयावर मार्गदर्शन केले. 3डी प्रिंटिंगच्या क्षेत्रात नवीन मटेरियल्सचा वापर व त्यांची क्षमता यावर सखोल प्रकाश टाकला. आधुनिक पॉलीमर मटेरियल्सच्या संशोधनामुळे उत्पादनाच्या गुणवत्तेत होणाऱ्या सुधारणा स्पष्ट केल्या. यासोबतच, नाविन्यपूर्ण स्लायसिंग तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनाची अचूकता व गती वाढवता येईल, यावर त्यांनी उदाहरणांसह चर्चा केली.

त्यांचे विचार केवळ तांत्रिक दृष्टीने महत्त्वाचे नव्हे, तर 3डी प्रिंटिंगमुळे उद्योगक्षेत्रात होणाऱ्या बदलांसाठी दिशादर्शक ठरतील, असे मत मान्यवरानी व्यक्त केले.

डॉ. रायकर यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त मा. आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ.ए.के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes