Awaj India
Register
Breaking : bolt
डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निक येथे वाचन संवाद उपक्रम*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची शिवाजी विद्यापीठ संघात निवडशैक्षणिक -औद्योगिक दरी दूर होईल- बॉबी क्यूरॅकोससीपीआरमधील फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव तात्काळ सादर करा : आमदार राजेश क्षीरसागरडि. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला ''नॅक"कडून मानांकन* डॉ.डी वाय पाटील पॉलिटेक्निक मध्ये बजाज कंपनीच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न डॉ. सुनील जे. रायकर यांचे 3डी प्रिंटिंगवर व्याख्यानचंदगड तालुक्यात विहिरीचे पैसे पाण्यातहोय, मी भांडी घासतोय!पोपट पवार,सर्जेराव नावले,शेखर पाटील,आदित्य वेल्हाळ,सचिन सावंत, नयन यादवाड यांना कोल्हापूर प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर

जाहिरात

 

श्री सिद्धिविनायकच्या प्रसादाला गोकुळच्या साजूक तुपाची चव.

schedule10 May 24 person by visibility 155 category



गोकुळसाठी भाग्याचा क्षण, मुंबईच्या सिद्धिविनायकच्या प्रसादसाठी गोकुळच्या तुपाचा वापर

चालू आर्थिक वर्षात २५० मेट्रिक टन तुपाचा पुरवठा करणार

                                                                                          -चेअरमन अरुण डोंगळे

 

कोल्हापूर, ता १० : उत्तम प्रतीच्या चवीमुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर गोकुळच्या दुधाचा आणि दुग्धजन्य पदार्थांचा लौकिक आहे. विशेष म्हणजे आता, गोकुळ दूध संघाच्या गायीच्या दुधाचे तूप आता मुंबई प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरातील प्रसादासाठी वापरले जाणार आहे. गायीच्या दुधाच्या तुप घेऊन गोकुळचे वाहन मुंबईकडे रवाना झाले. अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते वाहनाचे पूजन करण्यात आले. गोकुळ शिरगाव येथील गोकुळच्या प्रधान कार्यालयात हा कार्यक्रम झाला. ‘१ एप्रिल २०२४ ते ३१मार्च २०२५ या कालावधीत गोकुळकडून सिद्धिविनायक मंदिरासाठी २५० मेट्रिक टन तुपाचा पुरवठा करण्यात येणार आहे.’असे चेअरमन डोंगळे यांनी सांगितले. “सिद्धिविनायक मंदिर हे प्रसिध्द मंदिर असून महाराष्ट्र तसेच महाराष्ट्र बाहेरील लाखो भाविक भेट देत असतात. त्यांना ट्रस्टमार्फत प्रसाद दिला जातो या सिद्धिविनायकाच्या प्रसादात ‘गोकुळ’चे तूप वापरले जाणार आहे. हे गोकुळचे मोठे भाग्य आहे. ”अशा भावना चेअरमन डोंगळे यांनी व्यक्त केल्या. ते म्हणाले, ‘गोकुळला वर्षभरामध्ये एकूण २५० मेट्रिक टन गाय तूप सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टला पुरवठा करावयाचे आहे. गोकुळ प्रकल्पाची तूप उत्पादनाची क्षमता व त्याची गुणवत्ता उच्चतम असून उत्तम गुणवत्तेमुळेच गोकुळला हा पुरवठा करण्याबाबत आदेश प्राप्त झालेला आहे. यामुळे गोकुळ व सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट यांच्यामध्ये ऋणानुबंध जोडले जातील यामुळे गोकुळची मूल्यवृद्धी होण्यास मदत होईल.’

          याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी महा.व्यवस्थापक अनिल चौधरी, मार्केटिंग महा.व्यवस्थापक जगदीश पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक हनमंत पाटील,प्रकाश आडनाईक, हिमांशू कापडिया, लक्ष्मण धनवडे, उपेंद्र चव्हाण जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes