के एम सी काॅलेज मध्ये परिक्षेला सामोरे जाताना या विषयावर व्याख्यान
schedule08 Jun 22 person by visibility 195 category
कोल्हापूर: यशवंतराव चव्हाण (के एम सी) कॉलेज कोल्हापूर येथे आज 6 जून रोजी परिक्षेला सामोरे जाताना या विषयावर मा. प्रशांत चुयेकर, संपादक आवाज इंडिया लाईव्ह यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. कोरोना काळानंतर आॅफलाईन पध्दतीने विद्यापीठ स्तरावरून परिक्षा होत आहेत.त्यामुळे योग्य वाचन व नियोजन करुन परिक्षेला सामोरे जावा असे आवाहन प्रशांत चुयेकर यांनी केले. त्याच बरोबर डिजिटल मिडिया यामधील संधी या विषयावर ही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ अरुण पौडमल यांचे मार्गदर्शन मिळाले. भूगोल विभाग प्रमुख डॉ. जे एम शिवणकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मनोगत डाॅ. युवराज मोटे यांनी केले तर आभार प्रा. संतोष झित्रे यांनी मानले. या प्रसंगी महाविद्यालयाचे ग्रंथपाल रविद्र मांगले, डाॅ. संजय कांबळे, प्रा. संग्राम तोडकर व प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.