+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustविशाल अनिल आवडे यांना पुरस्कार adjustउद्योगजकांशी सरंक्षण क्षेत्रातील संधीबाबत जनरल विनोद खंदारे यांचे मार्गदर्शन adjustविकास कामाच्या 'ऋतू' मध्ये निधीचा 'अमल' न झाल्याची टीका adjustशाहुवाडी पन्हाळा विधानसभा मतदारसंघात विनय कोरे यांची डोकेदुखी वाढणार adjustशाही दसरा महोत्सवानिमित्त शुक्रवारी पारंपरिक वेशभूषा दिवस* adjustपुढील पाच वर्षात आणखी जोमाने काम करणार : आ. जयश्री जाधव adjustलोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी शुक्रवारपासून *दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर* adjustहळदी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बाजीराव चौगले adjustराज्यातील गरजूंपर्यंत प्रबोधनातून शासकीय योजनाही पोहोचवाव्यात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* adjustकिरण लोहार यांचा सन्मान
schedule01 Oct 24 person by visibility 62 categoryशैक्षणिकशैक्षणिक
कोल्‍हापूर;

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक २ ऑक्टोबर रोजी भारतात व भारताबाहेरही अनेक देशामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. भारताला स्वातंत्र मिळवून देण्यामध्ये महात्मा गांधीजींची भूमिका व त्यांचे कार्य अतिशय महत्वपूर्ण व प्रेरणादायी ठरली. आजही वर्तमान व भविष्यामध्ये सुद्धा महात्मा गांधीचे विचार व त्यांचे तत्वज्ञान संपूर्ण जगाला सत्य, अहिंसा, प्रेम, शांतता आणि एकात्मतेचा संदेश देणारे आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने महात्मा गांधीजीच्या विचारांचा व तत्वज्ञानाचा आदर्श स्विकारला तर प्रत्येक देश अतिशय शांततेच्या मार्गाने मोठ्या वेगाने प्रगती करू शकतो.  
        * *इतिहास विभाग, न्यू कॉलेज, कोल्हापूर.* यांनी त्यांचे विचार व कार्य सर्वसामान्य लोकापर्यंत पोह्चण्यासाठी महात्मा गांधीजी जयंती निमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजुषेचा उपक्रम हाती घेतला आहे.  
          ही प्रश्नमंजुषा सामाजातील सर्वासाठी खुली आहे. सदरची प्रश्नमंजुषा दिनांक १ ते ४ ऑक्टोबर पर्यंत सर्वांसाठी ऑनलाईन खुली राहील . या उपक्रमामध्ये, भाग घेऊन आम्हाला सहकार्य करावे ही विनंती. ही परीक्षा ५० मार्कांची असणार आहे. याचा वेळ सर्वांसाठी ४५ मिनिटाचा असेल. यामधील आवश्यक माहिती भरणे बंधनकारक आहे. या प्रश्नमंजुषा मध्ये उत्तीर्ण होणाऱ्याना प्रमाणपत्र (E- certificate) ई मेल वर उपलब्ध होईल. या ऑनलाईन उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकचा वापर करावा . यामध्ये सहभाग वाढविण्यासाठी ही लिंक जास्तीत जास्त शेअर करा.


प्राचार्य,
न्यू कॉलेज,
कोल्हापूर.
 http://form-timer.com/start/6aaaf655