जनसेवेसाठी तत्पर असणाऱ्या आमदार ऋतुराज पाटील यांना पुन्हा आमदार करूया: शुभांगी अडसूळ
schedule16 Nov 24 person by visibility 52 categoryराजकीय
कोल्हापूर, ता.15 : महिला स्वावलंबी व स्वयंपूर्ण व्हाव्यात यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. जनसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या आमदार ऋतुराज पाटील यांना पाठबळ देऊन पुन्हा आमदार करूया असे आवाहन सरनोबतवाडीच्या सरपंच शुभांगी अडसूळ यांनी केले. सरनोबतवाडी येथे आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रेदरम्यान त्या बोलत होत्या.
आमदार ऋतुराज पाटील यांच्या पदयात्रेमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. आमदार ऋतुराज पाटील यांच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून आ.ऋतुराज पाटील यांचे स्वागत केले.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, आजपर्यंत सकारात्मक राजकारण केले आहे. जनसेवेसाठी आपण कुठेही कमी पडणार नाही. दक्षिण मतदार संघातील सर्व गावांमध्ये आवश्यक सुविधा दिल्या आहेत. आणखी चांगले काम करण्यासाठी आपल्या सर्वांचे पाठबळ गरजेचे आहे.
माजी सरपंच उत्तम माने म्हणाले, विकासाचे व्हिजन कालबध्दरित्या साकारणे, विकासाला सामाजीक बांधीलकीची जोड देण्याची खासियत आमदार पाटील यांच्यात आहे. संकटकाळी मदतीसाठी धावून येणा-या आमदार ऋतुराज पाटील यांच्या विजयात सरनोबतवाडी ग्रामस्थांचा मोलाचा वाटा असेल.
ग्रामपंचायत सदस्य संग्राम गजबर, बाळकृष्ण खोत, अक्षय कोरे, योगिता अडसूळ, वैशाली माने, सामाजिक कार्यकर्ते किरण अडसूळ, खंडेराव माने, अनिल गजबर, सतीश लाड, प्रताप गजबर, महेश दुर्गुळे, शिवाजी तोरसकर, राजेश अडसूळ, योगराज अडसूळ, अनिकेत तोरस्कर, संतोष शिंदे, सुनिल कुंभार, तानाजी माने, सौरभ माने, कुलदिप अडसूळ, उत्तम अडसूळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.