Awaj India
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात* *आयईआयचा स्टुडन्ट चाप्टर सुरू*टोप हायस्कूल टोप मध्ये क्रीडा महोत्सवाचा जल्लोष प्रारंभनॅशनल कुस्ती अकॅडमी नंदगावच्या कुस्तीपटूंची यशस्वी कामगिरीविकास विद्या मंदिर सरनोबतवाडीत साकारत आहे डिजिटल क्लासरूमसकस आहार घेण्याचं विद्यार्थीनींना आवाहनगोकुळला ‘सर्वोत्कृष्ट प्रक्रिया तंत्रज्ञान व कार्यप्रणाली पुरस्कार’महाराष्ट्रातील पहिल्या सेंटर फॉर फ्युचर स्किल्सचे उद्घाटन*२३ रोजी उधळणार विजयाचा गुलाल - सौ. शौमिका महाडिकमी कधीही चुकलो नाही आणि चुकणारही नाही : राजेश क्षीरसागरसर्वसामान्य, व्यावसायिकांना लुटणे हाच लाटकर यांचा उद्योग - सुजित चव्हाण

जाहिरात

 

*विकासकामांच्या जोरावर दक्षिणेत विजय निश्चित; आमदार ऋतुराज पाटील

schedule05 Nov 24 person by visibility 62 categoryराजकीय

, उंचगाव येथे संपर्क सभा

कोल्हापूर,  : गेल्या पाच वर्षांच्या आमदारकीच्या काळात उचगावसह दक्षिण मतदारसंघात कोट्यवधींची विकासकामे केली. या विकासकामांच्या जोरावर दक्षिणेत आपला विजय निश्चित आहे असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी उंचगाव येथील मंगेश्वर मंदिर परिसरातील संपर्क सभेत ते बोलत होते.  

आ.ऋतुराज पाटील म्हणाले, उंचगावचे माझ्या आयुष्यात वेगळे स्थान आहे. मंगेश्वराच्या साक्षीने ‘दक्षिण’ मोहीमेची सुरुवात करत आहे. ही मोहीम तुमची आमची सगळ्यांची आहे. भविष्यातही ऋतुराज पाटील आपल्या मदतीसाठी नेहमीच तत्पर राहील. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे करवीर तालुका प्रमुख राजु यादव म्हणाले, आमदार ऋतुराज पाटील यांनी मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. या जोरावरच ते दक्षिण मतदारसंघात बाजी मारतील.

डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये उचगावमधील शेकडो लोक उपचार घेऊन बरे झाले आहेत. आमदार ऋतुराज पाटील यांनी या हॉस्पीटलच्या माध्यमातून गोरगरीबांना मोठा आधार दिल्याचे सांगत उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण भावूक झाले. 

अश्विनी चव्हाण यांनी आ.ऋतुराज पाटील यांचा विजय हीच आम्हां बहिणींची ओवाळणी आहे. 

श्रेयस कदम, दीपक रेडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपसरपंच तुषार पाटील, माजी सरपंच गणेश काळे, दादू चौगुले, जि. प.च्या माजी सदस्या मंगल वळकुंजे, कावजी बापू, पं. स. च्या माजी सदस्या पूनम जाधव, मल्लू माळी, बाळासो बोचके, धुळाप्पाना वळकुंजे, वैभव पाटील, माणिक पाटील, विराग करी, संजय चौगले, बबन जाधव, गोपी मणेर, पांडू माने, शिवाजी निगडे, दशरथ चौगुले, संभाजी यादव, दीपक पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes