नॅशनल कुस्ती अकॅडमी नंदगावच्या कुस्तीपटूंची यशस्वी कामगिरी
schedule09 Dec 24 person by visibility 445 categoryक्रीडा
कोल्हापूर ; सिद्धी साळुंखे
नंदगाव (ता. करवीर) येथील नॅशनल कुस्ती अकॅडमीने कुस्ती क्षेत्रात मोठे यश संपादन केले आहे. एन.आय.एस. कोच कृष्णान कांबळे व एन.आय.एस कोच तानाजी कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अकॅडमीत प्रशिक्षण घेत असलेल्या कुस्तीपटूंनी विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे.
सतेज दळवी ने 45 किलो वजन गटात साई नॅशनल सुवर्णपदक, अनिकेत पाटील ने 48 किलो वजन गटात राज्यस्तरीय सुवर्णपदक मिळवून नॅशनल सिलेक्षन केले, तर महेश पाटील ने 50 किलो गटात शालेय नॅशनल सिलेक्षन केले. केदार वाडकर 60 किलो वजन गटात शालेय नॅशनल सिलेक्षन मध्ये सहभागी झाला, अतुल मगदूम ने 77 किलो गटात खाशाबा जाधव स्पर्धेत रौप्यपदक जिंकले, विवेक चौगले ने 82 किलो गटात महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कास्यपदक मिळवले, सुयश साठे ने 48 किलो गटात राज्यस्तरीय द्वितीय क्रमांक मिळवला आणि प्रणिती साठे ने 45 किलो गटात शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग नोंदवला.
याशिवाय, राजवीर कुंभार आणि शुभम चौगले यांची निवड नागराज मंजुळे यांच्या आगामी मराठी चित्रपटासाठी खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट मध्ये झाली आहे.