Awaj India
Register
Breaking : bolt
आर्किटेक्चर नंतर करिअरच्या* *अमर्याद संधी - डॉ. ए. के. गुप्ता*नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कधी भरपाई देणार**डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये* *शनिवारी ‘डायबेटिक फूट’वर परिषद*अतिसार थांबवा अभियान’ प्रभावीपणे राबवा - जिल्हाधिकारी अमोल येडगे*खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा १०० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण* :वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडून विविध विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा*वनस्पतीच्या वाढीसाठी मुळांचे आरोग्य महत्वाचे – प्रा. डॉ. के. प्रथापन* चुये येथे बेंदूर सण उत्साहात साजरावह्याची मदत गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी, आभाळा इतकी; डॉ. राजन गवसव्हनाळी उपसरपंचपदी संजयबाबा घाटगे गटाच्या अश्विनी जांभळे यांची निवड

जाहिरात

 

वह्याची मदत गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी, आभाळा इतकी; डॉ. राजन गवस

schedule14 Jun 25 person by visibility 504 categoryराजकीय

 वह्याची, मदत गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी, आभाळा इतकी; डॉ. राजन गवस
कोल्हापूर ;
आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या वह्या म्हणजे, गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी, ही मदत आभाळा इतकी मोठी आहे. या वह्या विद्यार्थ्यांच्या मनात अनेक स्वप्न तयार करतात. वही स्वरुपी या मदतीतून, लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागत असून, संवेदनशील नेतृत्व म्हणून, आमदार सतेज पाटील यांचा हा उपक्रम अनुकरणीय आहे. असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यक डॉ. राजन गवस यांनी काढलेत. आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त संकलित झालेल्या वह्या वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.
 विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या ६ लाख वह्यांचे वाटप, आज शनिवारी ज्येष्ठ साहित्यक डॉ.राजन गवस यांच्या हस्ते करण्यात आलं. शाहू स्मारक भवन येथे हा कार्यक्रम आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. 
 यावेळी बोलताना डॉ. राजन गवस यांनी, एखादा लोकप्रतिनिधी, एखादा प्रघात बदलून त्याला विधायक वळण देण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा किती मोठे काम उभे राहू शकते याचा वस्तुपाठ आमदार सतेज पाटील यांच्या वही संकलनाच्या उपक्रमातून पाहायला मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या वह्या म्हणजे, गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी, ही मदत आभाळा इतकी मोठी आहे. वही स्वरुपी या मदतीतून, लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागत असून संवेदनशील नेतृत्व म्हणून, आमदार सतेज पाटील यांचा हा उपक्रम अनुकरणीय आहे. असे गौरवोद्गारही ज्येष्ठ साहित्यक डॉ. राजन गवस यांनी काढलेत. सध्याच्या शैक्षणिक पद्धतीवरही डॉक्टर राजन गवस यांनी परखड मत व्यक्त केलं. एक चांगला माणूस घडवणाऱ्या शिक्षणाची सद्या गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुलांना समर्थ बनवा. मोबाईलच्या अतिवापरापासून मुलांना दूर ठेवा, एक दिवस मोबाईलचा उपवास करा. नकार पचवायची शक्ती मुलांच्या मध्ये तयार करा. असं आवाहनही त्यांनी केलं.
 
 या कार्यक्रमा वेळी, माजी महापौर वंदना बुचडे , 
माजी उप महापौर संजय मोहीते, माजी उपमहापौर प्रकाश पाटील, भुपाल शेट्टे, सुलोचना नायकवाडे, माजी नगरसेवक प्रविण केसरकर, राजेश लाटकर, राहूल माने, संदीप नेजदार, मधुकर रामाणे, माणिक मंडलीक , लाला भोसले, विनायक फाळके, रवी आवळे, मोहन सालपे , तौफीक मुल्लणी, प्रकाश चौगले, विक्रम जरग, दुर्वास कदम , रियाज सुभेदार सुनिल मोदी यांच्यासह महाविकास आघाडीतील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes