जुना बुधवार तालीम मंडळाच्या उर्वरित बांधकामासाठी आमदार जयश्री जाधव यांच्याकडून 25 लाखाचा निधी
schedule19 Aug 24 person by visibility 170 category
खासदार शाहू छत्रपती व आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते बांधकामाचा शुभारंभ
कोल्हापूर : सामाजिक स्तरावर विविध प्रकारचे उपक्रम राबवत, जुना बुधवार पेठ तालीमने जपलेली सामाजिक बांधीलकी कौतुकास्पद आहे असे मत खासदार शाहू छत्रपती यांनी व्यक्त केले.
जुना बुधवार तालीम मंडळाच्या इमारतीच्या उर्वरित बांधकाम पूर्ण करण्यासाठी आमदार जयश्री चंद्रकात जाधव यांनी २५ लाखाच निधी दिला आहे. या इमारत बांधकामाचा शुभारंभ खासदार शाहू छत्रपती व आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी महापौर महादेवराव आडगुळे होते.
खासदार शाहू छत्रपती म्हणाले, तालीम संस्था या कोल्हापूर शहराच्या अस्मिता आहेत, ही सामाजिक केंद्र आहेत. त्यामुळे तालीम संस्थाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द आहे.
आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, या तालमी इमारतीच्या बांधकामासाठी निधी देण्याचे आश्वासन दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव ( आण्णा) यांनी दिले होते. त्यांच्या माघारी या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करीत होते. परंतु तालमीच्या इमारतीसाठी विकास निधी देताना विरोधकांनी राजकारण केले. या राजकारणावर जिद्दीने मात करत निधीची उभारणी केली आणि आज या बांधकामाचा शुभारंभ होत आहे.
कोल्हापूर शहरातील प्रत्येक प्रश्नांवरती आवाज उठवणाऱ्या, प्रत्येक कामामध्ये हिरीरीने भाग घेणाऱ्या, प्रत्येक कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या आमदार जयश्री जाधव यांनी विकास कामातून आपली स्वतःची आयडेंटी निर्माण केली आहे असे गौरव उद्गार माजी महापौर महादेवराव अडगुळे यांनी व्यक्त केले.
यावेळी खासदारपदी निवडून आल्याबद्दल शाहू छत्रपती यांचा व बांधकामास २५ लाखाचा निधी दिल्याबद्दल आमदार जयश्री जाधव यांचा तालमीच्यावतीने सत्कार करण्यात आला. तसेच २५ लाखाचा निधी दिल्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी महापौर महादेवराव आडगुळे व जुना बुधवार तालमीचे अध्यक्ष रणजित शिंदे याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच इंजिनिअर संतोष भोसले, वकील प्रशांत पाटील, आर्किटेक्ट किशोर पाटील यांचा सत्कार केला.
तालमीचे अध्यक्ष रणजित शिंदे यांनी तालमीच्या १८२ वर्षाच्या इतिहासाला उजाळा दिला.
यावेळी माजी उपमहापौर दिगंबर फराकटे, स्थायी समितीचे माजी सभापती नंदकुमार मोरे, माजी नगरसेवक धनंजय सावंत, अफजल पीरजादे, इब्राहिम मुल्ला, अनिल पाटील, नेपोलियन सोनूले, गणेश जाधव, राहुल घाटगे, धनाजी दिंडे, प्रवीण हुबाले, रवी सावंत, नंदकुमार पाटिल, इंद्रजित आडगुळे, बाबा दिंडे, धनाजी शिंदे, कपिल नाळे, शशिकांत दिंडे, आनंदराव पाटील, संतोष भोसले, किशोर पाटील, दिलीप पाटिल, रमेश गवळी, दिलीप ठाणेकर, रवी दळवी, सुमित कदम, हेमंत साळोखे, मकरंद स्वामी, सेक्रेटरी सुनील शिंदे, रमेश पुरेकर, राजू माने, सुशांत महाडिक, विराज पाटील, श्रीधर निकम व संग्राम पाटिल आदी उपस्थित होते. सुशिल भांदिगरे यांनी स्वागत तर संतोष दिंडे यांनी प्रास्ताविक केले.