Awaj India
Register
Breaking : bolt
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील दादा यांच्या अखेरच्या दर्शनासाठी लोकांची मोठी गर्दीशिक्षण क्षेत्रात संस्था उभारणीचं मोठं काम करणाऱ्या दूरदृष्टीच्या नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली : राज ठाकरे कुलगुरू यांनी घेतले शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शनमाजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचा* *‘बेस्ट इन्स्टिट्यूट’ पुरस्काराने सन्मान*गोकुळ निवडणुकीसाठी कोल्हापूर खंडपीठाने वाढीव कालावधी द्यावा – माणिक पाटील (चुयेकर)कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण कामाला गतीगोकुळ दूध संघाचा निवडणूक कार्यक्रम तत्काळ सुरू करण्याचे आदेश!*डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या* *६३८ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड*दादासाहेब गवई यांच्या ११ व्या स्मृतीदिनानिमित्त कोल्हापुरात अभिवादन

जाहिरात

 

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील दादा यांच्या अखेरच्या दर्शनासाठी लोकांची मोठी गर्दी

schedule05 Aug 26 person by visibility 26 category

 

कोल्हापूर : शिक्षण, समाजकारण आणि क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणारे पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील दादा यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यांच्या निवासस्थानी शोकाकुल वातावरण असून दिवसभर विविध स्तरांतील नागरिकांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.

आज सकाळपासून शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, क्रीडा, वैद्यकीय तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी डॉ. डी. वाय. पाटील दादा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

यामध्ये खासदार शाहू महाराज छत्रपती, वनमंत्री गणेश नाईक, विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मंत्री हसन मुश्रीफ, उद्योगमंत्री उदय सामंत, निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील, आमदार अमित देशमुख, आमदार जयंत पाटील, आमदार अमल महाडिक, महापौर रूपाराणी निकम तसेच अभिनेते भरत जाधव यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश होता.

याशिवाय शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर, विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनीही डॉ. डी. वाय. पाटील दादा यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले . त्यांच्या निधनामुळे शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes