राधानगरी आरोग्य विभागा मार्फत जागतीक आरोग्य दिन साजरा
schedule10 Apr 23 person by visibility 376 categoryआरोग्य
सोन्याची शिरोली (आवाज इंडिया प्रतीनीधी सुरेश कांबळे)
राधानगरी आरोग्य विभागा मार्फत जागतीक आरोग्य दिन साजरा करण्यात आला.
जागतिक आरोग्य दिना निमित्त सुंदर माझा दवाखाना या नुसार आरोग्य अधिकारी डॉ.आर.आर.शेट्ये यांचे मार्गदर्शन लाभले.
७ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३८ उपकेंद्रात अंतर्गत बाह्य स्वच्छता करून घेण्यात आली . सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राना.सुंदर माझा दवाखाना योजना राबवली.
प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची व उपकेंद्राची स्वच्छता करण्याचे आवाहन केले.
आरोग्य विस्तार अधिकारी आर.एस.पाटील, आरोग्य साहाय्यक मोहीते आदी मान्यवर उपस्थित होते.