+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjust*१ मे ला 'O, Freedom..!' चे प्रकाशन* adjustसंविधानाबाबत गैरसमज पसरविणाऱ्या कॉंग्रेस प्रवृत्तीला कायमचे गाडा. " : राजेश क्षीरसागर; adjustमंडलिक, माने यांना विजयी करा ; राजर्षी शाहू महाराजांचे पणतू राजवर्धन कदमबांडे adjustप्रवक्त्याचे वटमुखत्यारपत्र जाहीर सभेत चालते, संसदेत नाही; adjustशाहू विचार दर्शन पदयात्रेत समतेचा जागर adjustमोदींच्या गॅरंटीची कसलीही वॉरंटी नाही : नितीन बानुगडे-पाटील adjust*डी. वाय. पाटील आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांच्या* *डिझाईन्सचे सोमवारपासून राजर्षी शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शन* adjustमहालक्ष्मीनगर, मंगेशकर नगर, मंडलिक वसाहतीत काँग्रेसचा प्रचार adjustउपकाराची परतफेड अपकाराने करणार्‍या कृतघ्न खासदारांना त्यांची जागा दाखवा : आ. सतेज पाटील adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील
schedule13 Mar 24 person by visibility 80 categoryसामाजिक

करवीर पंचायत समितीवर आरपीआय (आ) युवक आघाडीचा हल्लाबोल
 विविध मागण्यांसाठी गटविकास अधिकारी यांना अविनाश शिंदे यांनी धरले धारेवर

कोल्हापूर आवाज इंडिया

             रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) करवीर तालुका युवक आघाडीच्या वतीने विविध मागण्यांसाठी करवीर पंचायतीसमोर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीने गटविकास अधिकारी यादव यांच्यासमोर टाहोच फोडला. या मोर्चाचे नेतृत्व कोल्हापूर जिल्हा आरपीआय युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अविनाश शिंदे यांनी केले.
जोर से बोल जय भीम बोल, उठ दलिता हल्लाबोल, आर्थिक व्यवहारातून जनतेला लुबाडणाऱ्या ग्रामसेवकांचा धिक्कार असो, त्या ग्रामसेवकांना निलंबित करा, गायरान जमिनीवर घरकुल द्या, आर्थिक व्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. युवक आघाडीच्या या मोर्चाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. करवीर तालुक्या मधील बरेच ग्रामसेवक आर्थिक व्यवहार केल्याशिवाय कामे करत नाहीत रोहिदास चौगुले हे ग्रामसेवक ग्रामस्थांचे पैसे घेतल्यावरच त्यांच्या कामाला प्राधान्य देतात. हे दिसून आले. तब्बल लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार हे करतात अशा ग्रामसेवकांवर गटविकास अधिकाऱ्यांना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश देऊन देखील कोणतेही कार्यवाही केली नाही. याबद्दल गटविकास अधिकाऱ्यांना धारेवर धरून त्यांचा निषेध करण्यात आला. केर्ली, चिंचवाड, गडमुडशिंगी या गावांमध्ये तेथील ग्रामसेवकाने केलेला मोठा भ्रष्टाचार पुराव्यांसह गटविकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देखील गटविकास अधिकाऱ्यांनी कोणतेही कार्यवाही केली नाही म्हणून त्यांना अविनाश शिंदे यांनी जाब विचारला.
कार्यकर्ते आक्रमक झाल्यानंतर अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनालाही बोलवण्यात आले. गटविकास अधिकारी यावर लक्ष घालत नाहीत याचा जाब जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी विचारत त्यांना घाम फोडला. जोपर्यंत आम्हाला तुम्ही लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, असा पवित्रा जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी घेतला त्यानंतर हे आक्रमक रूप पाहून दिलेल्या निवेदनाची दूरध्वनीच्या माध्यमातून वरिष्ठांना माहिती देऊन त्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यावेळी कार्यकर्ते हे गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठीया मांडून बसले होते.
 यावेळी देखील कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. गटविकास अधिकारी येऊन जे काही प्रश्न आहेत ते निश्चितपणाने सोडवले जातील असे सांगितल्यावर कार्यकर्त्यांनी लेखी आश्वासनाच्या माध्यमातून आंदोलन मागे घेतले. भर उन्हाच्या तडाक्यात हे निदर्शन आंदोलन करण्यात आल्यामुळे गटविकास अधिकारी यादव यांनाही कार्यकर्त्यांनी भर उन्हात उभा करून घेतले तसेच हे आंदोलन केल्यानंतर जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी त्यांना अर्धा तास खाली बसण्यास भाग पाडले. त्यांना त्रास होत होता परंतु अविनाश शिंदे म्हणाले की, साहेब जनता उन्हात तळपते आहे तुम्ही एसी फॅनमध्ये ऑफिसमध्ये बसून राहता एक दिवस असं बसल्यावर काय होतं हे देखील तुम्ही पहा .असं म्हणून कार्यकर्त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना जर या दिलेल्या प्रश्नांची सोडवणूक नाही केली तर भ्रष्टाचारी ग्रामसेवक आणि तुमची खुर्ची बाहेर फेकली जाईल असा सज्जड दम दिला आणि हे आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात करवीर तालुका युवक आघाडीचे अध्यक्ष सुभाष कांबळे,उपाध्यक्ष संतोष कांबळे, आयटी सेल प्रमुख अमर कांबळे, गांधीनगर शहराध्यक्ष अंकुश वराळे, आकाश जाधव, शितल जाधव, दशरथ कांबळे, अभिजीत कोगले, सरदार कांबळे, सतीश कांबळे, नितीन कांबळे, सर्जेराव कांबळे, अतुल सडोलीकर, प्रदीप मिरजकर, भीमराव कांबळे ,सचिन कोणवडेकर, बिट्टू सांगवडेकर, बबन कांबळे,लखन कांबळे, अरुण कांबळे, विजय कांबळे, आकाश जाधव, संग्राम कांबळे, विलास पवार, कुमार कांबळे, आदी युवा आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.