Awaj India
Register
Breaking : bolt
स्नेहल सचिन घाडीगावकर यांना महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कारमहात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्काराने सौ. स्नेहल सचिन घाडीगावकर सन्मानित ऊर्जा संचय तंत्रज्ञानासाठी* *डी. वाय. पाटील विद्यापीठाला पेटंट*डॉ.डी.वाय.पाटील पॉलिटेक्निकमध्ये* *गौरी गीते स्पर्धा उत्साहात*बेलवळे खुर्द सरपंचपदी अनिता पाटील बिनविरोध राजारामपुरीत साकारणार महाराष्ट्राची लोकसंस्कृती मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा’ स्पर्धेत* *कै. यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालय प्रथम*वंचित बहुजन आघाडीच्या करवीर तालुकाध्यक्षपदी नितीन कांबळेअवयवदान :मृत्यूनंतरचे खरे अमरत्त्व!डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसकडून* *एआय आधारित हाय व्होल्टेज स्विचिंग युनिटचे संशोधन*

जाहिरात

 

डी.वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये डीप लर्निंग कार्यशाळा संपन्न

schedule13 Mar 24 person by visibility 372 categoryशैक्षणिक



 कोल्हापूर: येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागातर्फे एक दिवसीय डीप लर्निंग या कार्यशाळा संपन्न झाली. विद्यार्थ्यांच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या क्षमतेत वृद्धी करून त्यांच्या करिअरसाठी नवीन दिशा देणे हा या कार्यशाळेचा उद्देश होता. 
    
या कार्यशाळेसाठी आयआयआयटी नागपूरचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. निलेशचंद्र पिकले यांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या शेवटी एनव्हीडीआय कंपनीकडून परीक्षा घेण्यात आली, यातील उत्तीर्ण विद्यार्थ्याना प्रमाणपत्र देण्यात आले. या परीक्षेसाठी 90 डॉलर खर्च येतो मात्र एनव्हीडीआय डीप लर्निंग इन्स्टिट्यूटमार्फत महाविद्यालयाच्या 80 विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा मोफत घेण्यात आली.

या वर्कशॉपमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती प्राप्त झाली. प्रायोगिक प्रशिक्षण घेऊन तंत्रज्ञानाचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी त्याचा वापर समजून घेतला. 

 या कार्यशाळेचे नियोजन महाविद्यालयाचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभाग प्रमुख डॉ. सिद्धेश्वर पाटील, प्रा. नितीश शिंदे व इतर प्राध्यापक वर्ग यांनी केले. शिवाजी युनिव्हर्सिटी लीड कॉलेज स्कीम अंतर्गत हे वर्कशॉप घेण्यात आले.

  संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील , उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes