डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये टेक्नोवा तांत्रिक स्पर्धा उत्साहात
schedule14 Mar 24 person by visibility 219 categoryशैक्षणिक
कोल्हापूर ; आवाज इंडिया
कसबा बावडा येथील डॉ.डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये टेक्नोवा या तांत्रिक स्पर्धा अत्यंत उत्साह मध्ये संपन्न झाल्या.
सात वेगवेगळ्या स्पर्धामध्ये 526 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे उद्घाटन गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष दीपक चोरगे यांच्या हस्ते झाले. यावेळी डी वाय पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ.ए.के.गुप्ता, प्राचार्य डॉ. महादेव नरके प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना दीपक चोरगे यांनी सांगितले की, विद्यार्थी जीवनामध्ये अभ्यासाबरोबरच वेगवेगळी कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यांनी तंत्रस्नेही सुद्धा होणे महत्वाचे आहे. भाषेवरील प्रभुत्व, सादरीकरण आणि आत्मविश्वास या गोष्टी करीअरसाठी उपयुक्त ठरतात . टेक्नोवासारख्या स्पर्धामुळे विद्यार्थ्यांना चांगले व्यासपीठ उपलब्ध झाल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. ए.के. गुप्ता यांनी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये बहुशाखीय अभ्यासाला महत्त्व दिले आहे.समाजाला उपयोगी असणारे संशोधन विद्यार्थ्यांनी करावे, असे आवाहन केले.
प्राचार्य डॉ.महादेव नरके यांनी पॉलिटेक्निकच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी घेण्यात येणाऱ्या टेक्नोवा स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे नमूद केले.
यावेळी पेपर प्रेझेंटेशन, पोस्टर प्रेझेटेशन, ग्राफीनोवा, क्वीज, टेकफ्युजन, टेक रिक्रुटमेंट, रोबोरेस आधी स्पर्धा झाल्या.
यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय डी.पाटील, ट्रस्टी आमदार ऋतुराज पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.
यावेळी उपप्राचार्य प्रा. नितीन माळी,रजिस्ट्रार सचिन जडगे, ससमन्वयक प्रा. धैर्यशील नाईक यांच्यासह विभाग प्रमुख आणि विद्यार्थी उपस्थित होते.