+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustवर्कशॉपमधून वेळाने बाहेर पडणार्या ड्रायव्हरांचे वेतन कपात adjustरत्नागिरी व सिंधुदुर्ग नागरी संरक्षण कार्यालयाच्या "उपनियंत्रक गट अ" पदासाठी* *इच्छुकांनी नावे कळवावीत* adjustदक्षिण मधील मतदारांना सुज्ञ उमेदवाराचे आवाहन adjustभाजपचे बंडखोर वसंत पाटील दक्षिण मधून निवडणुकीच्या तयारीत adjustसुकेशनी सुरेश कांबळे ऊर्फ सई स्वप्निल डिगे नेट परीक्षा उत्तीर्ण adjustमार्केट सेसच्या सुधारित जी आर चे व्यापाऱ्यांच्याकडून साखर पेढे वाटून स्वागत adjustपालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून बांधकाम कामगारावर अन्याय adjustकेंद्रीय रेल्वे व जलशक्ती राज्यमंत्री श्री. व्ही. सोमन्ना यांचा जिल्हा दौरा adjustमिशन रोजगार’ अंतर्गत रविवारी* *कॉर्पोरेट स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम* adjustकोल्हापुरातील महायुतीच्या तीन विधानसभा मतदार संघात ठिणगी
schedule07 Jun 24 person by visibility 157 category
 ..

कोल्हापूर , ता. ७ : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या डॉ बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि संस्थामाता श्रीमती सुशिलादेवी साळुंखे शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली. उच्च दर्जाचे अभियांत्रिकी शिक्षण वि‌द्यार्थ्यांना अगदी माफक शुल्कामध्ये उपलब्ध व्हावे असा उद्देश या शिष्यवृत्तीच्या निर्मितीमागे आहे . अशी माहिती 
 मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


 गावडे म्हणाले, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे गुणवत्ता शिष्यवृत्ती या योजने अंतर्गत जे विद्यार्थी डॉ .बापूजी साळुंखे अभियांत्रिकी महावि‌द्यालयात प्रवेश घेतील त्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार शैक्षणिक फी मध्ये सवलती मिळतील. या योजेअंतर्गत ज्या वि‌द्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेमध्ये ९५ पर्सेटाइल किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळतील त्यांना त्यांच्या कोर्स कालावधीमध्ये १०० टक्के ट्युशन फी माफ होईल. तसेच ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेमध्ये ८५ ते ९४. ९९ पर्सेटाइल इतके गुण मिळतील त्यांना त्यांच्या कोर्स कालावधीमध्ये ७५ टक्के ट्यूशन फी माफ होईल . आणि ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेमध्ये ७५ ते ८४. ९९ पर्सेटाइल गुण मिळतील त्यांना त्यांच्या कोर्स कालावधीमध्ये ५० टक्के ट्यूशन फी माफ होईल.

संस्थामाता श्रीमती सुशीलादेवी साळुंखे शिष्यवृत्ती या योजने अंतर्गत जे विद्यार्थी श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतून परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत त्यांना संस्थेच्या पदवी अभियांत्रिकी महावि‌द्यालयात प्रवेश घेतले नंतर ट्युशन फी मधील रुपये पाच हजार प्रती वर्ष इतके शैक्षणिक शुल्क संपूर्ण शैक्षणिक कालावधीसाठी माफ होणार आहे.

संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभय कुमार साळुंखे, संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येणाऱ्या या योजनांचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन प्राचार्य विरेन भिर्डी यांनी केले.