असित बनगे: आवाज इंडिया प्रतिनिधी
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सन २०२२-२३ ते सन २०२७-२८ या कालावधी करता निवडणुकीचा कार्यक्रम,आखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे काळजीवाहू अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे.
दिनांक 14 सप्टेंबर 2022 ते 22 नोव्हेंबर 2022, या कालावधीत ही निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार असून यासाठी भोसले यांच्याकडून निवडणूक समिती नेमण्यात आली आहे. यामध्ये जळगावचे ॲड.प्रशांत जीवनराव पाटील-मुख्य निवडणूक अधिकारी, ॲड. प्रताप वसंत सिंग परदेशी-निवडणूक अधिकारी, आकाराम पाटील-निवडणूक अधिकारी, पुणे येथील शहाजीराव पाटील व मुंबई येथील सुनील मांजरेकर यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून येत्या 27 तारखेपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम:
दि.२७ सप्टेंबर २०२२ रोजी सभासदांची कच्ची मतदार यादी, प्रमुख कार्यालय कोल्हापूर सह मुंबई, पुणे,नाशिक औरंगाबाद,नागपूर शाखेतून प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
२७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत कच्च्या मतदार यादीवरील हरकती व दोष दुरुस्ती स्वीकारण्यात येणार आहेत.
१२ ऑक्टोंबर २०२२ रोजी प्रमुख कार्यालय कोल्हापूर येथे सभासदांची पक्की मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
१३ ते १५ ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत प्रमुख कार्यालय कोल्हापूर व इतर शाखांमध्ये उमेदवारी अर्ज वाटप करण्यात येणार आहेत.
१७ ते १९ ऑक्टोंबर २०२२ दरम्यान हे अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
२० ऑक्टोबर २०२२ रोजी प्रमुख कार्यालय कोल्हापूर येथे उमेदवार अर्जांची यादी प्रसिद्ध होणार असून, २७ तारखेला उमेदवारी अर्ज यांची छाननी करण्यात येणार आहे.
२९ ऑक्टोबर व ३१ ऑक्टोंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत उमेदवारी अर्ज प्रमुख कार्यालय कोल्हापूर येथे मागे घेतले जातील. व ४ नोव्हेंबर २०२२ रोजी निवडणुकीस पात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
१८ ते २० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत कोल्हापुरातून मतदान साहित्य विविध मतदान केंद्रावर पाठवण्यात येणार आहे.
तर २० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ दरम्यान कोल्हापूर, मुंबई,पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर,नवी मुंबई, या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
दिनांक २२ नोव्हेंबर २०२२ रोजी महामंडळाचे प्रमुख कार्यालय कोल्हापूर येथे मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे. असा अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने अध्यक्ष मेघराज भोसले यांनी आज कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत जाहीर केला आहे.तर यावेळी ॲड.प्रशांत पाटील, प्रताप परदेशी, आकाराम पाटील, शहाजीराव पाटील, सुनील मांजरेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.