परदेश शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यांनी 12 जुलै पर्यंत अर्ज सादर करावेत
schedule12 Jun 24 person by visibility 234 category
कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्ती सन 2024-25 साठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्जाचा नमुना व अधिक माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. संकेतस्थळवरील अर्ज डाऊनलोड करुन तो परिपूर्ण भरुन आवश्यक त्या कागदपत्रासह दि. 12 जुलै 2024 पर्यंत समक्ष किंवा पोस्टाने समाज कल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे-411001 येथे सादर करावा.
या योजनेसाठी सन 2024-25 करीता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे आयुक्त,ओमप्रकाश बकोरिया यांनी केले आहे.