गौरव शिंदे
आवाज इंडिया कोल्हापूर
गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे .तरुण मंडळांमध्ये या उत्सवाच्या तयारीची लगबग सुरु झाली आहे.बापट कँप मध्ये कुंभार बांधव गणेश मूर्तींवर अखेरचा हात मारत आहेत. दरवर्षी येथून परदेशात , परराज्यात गणेश मूर्तींना मोठी मागणी असते.
गणेश उत्सव म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत उत्सुकता असते.गणेशाच्या आगमणाची तयारी ,सजावट मंडळांमध्ये मंडप उभारणे यामध्ये तरुणांचे नियोजन सुरु झाले आहे . बापट कँप मध्ये विविध स्वरुपात आकर्षक अशा गणेशमूर्ती पहायला मिळत आहेत यामध्ये बालगणेश,पाटील,दगडूशेठ, चिंतामणी अशा मूर्ती पहायला मिळत आहेत.यावेळी गणेश मूर्तींच्या किंमतीत पंचवीस ते तीस टक्के वाढ झाली आहे.बाजारपेठेत विविध प्रकारचे दागिने ,हार,वस्रे,फुलांच्या माळा दाखल झाल्या आहेत.