कौस्तुभ गावडे यांना राजकीय, शिक्षक संघटना आणि शैक्षणिक संस्थांचा वाढता पाठिंबा!*
schedule11 Oct 26 person by visibility category
*जनता दल (सेक्युलर), दलित पँथरसह विविध शैक्षणिक संस्थांचा जाहीर पाठिंबा; उमेदवारीला बळ*
कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष व महायुतीचे उमेदवार शिक्षकमित्र श्री. कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना राजकीय पक्ष, शिक्षक संघटना आणि शैक्षणिक संस्थांकडून मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे. जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र, दलित पँथर तसेच कारेश्वर शैक्षणिक संस्था, ब्रिलियंट स्कूल नरंदे, खोची हायस्कूल, खोची, कै. प्रताप लक्ष्मणराव चौगुले हायस्कूल, खोची आणि जय शिवराय शिक्षण प्रसारक मंडळ, भादोले यांनीही कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे
विविध शैक्षणिक संस्थांनी गावडे यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दर्शविल्याने त्यांच्या प्रचाराला बळ मिळत असल्याचे चित्र आहे.
जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्राचे अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, दलित पँथरचे यशवंतभाऊ नडगम, जय शिवराय शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष श्री. बी. आर. पाटील, सचिव श्री. पी. टी. पाटील, कै. प्रताप लक्ष्मणराव चौगुले हायस्कूलचे अध्यक्ष जयवंत लक्ष्मणराव चौगुले, खोची हायस्कूलचे अध्यक्ष बी. के. चव्हाण, ब्रिलियंट स्कूलचे अध्यक्ष नितीन पाटील आणि कारेश्वर शैक्षणिक संस्थेचे ॲड. संग्रामसिंह शेवाळे यांनी कौस्तुभ गावडे यांना पाठिंबा जाहीर करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, शिक्षण क्षेत्रातील अडचणी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सेवाविषयक प्रश्न आणि शैक्षणिक संस्थांसमोरील विविध आव्हाने प्रभावीपणे मांडण्यासाठी सक्षम प्रतिनिधित्वाची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारीला विविध स्तरांतून मिळणारा पाठिंबा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणे, शिक्षण क्षेत्रातील समस्या शासनदरबारी मांडणे आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शैक्षणिक संस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रभावी प्रयत्न करणे, या अपेक्षांमुळे गावडे यांच्या उमेदवारीकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि शैक्षणिक संस्थांकडून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला नवे बळ मिळत असून, आगामी काळात या पाठिंब्याचे राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.