
गौरव शिंदे
कोल्हापूर: सध्याच्या धावपळीच्या जीवणामध्ये समाज्यामध्ये फसवणूकीचे प्रकार घडत असताना आजही प्रामणिकपणा शिल्लक असल्याचे अमर कुडपकर यांनी प्रामाणिकपणे पैशाचे व महत्त्वाचे कागदपत्रे असलेले पाकीट परत केल्याने दिसून आले.
कदमवाडी जवळील घाटगे कॉलणी मध्ये रहाणारे अमर कुडपकर यांना कॉलणीमध्ये राजवर्धन संजय शिंदे यांचे रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेले पाकीट सापडले .त्यामधील कागदपत्रांच्या आधारे संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन त्यांनी पाकिट परत केले.अमर कुडपकर यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणा बद्दल राजवर्धन संजय शिंदे यांनी आभार मानले.