
इस्लामपूर (आवाज इंडिया)
तेलंगणा राज्यात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी शेतकऱ्यांना सर्व सुविधा दिल्या आहेत.त्यामुळे तेथील शेतकरी सुखात आहेत. देशातील शेतकरी सुखात राहायचा असेल तर पंतप्रधान चंद्रशेखर यांना पाठिंबा दिला पाहिजे असे आवाहन महाराष्ट्राचे प्रभारी वामशीधर राव यांनी केले.
ती इस्लामपूर येथे सन्मान मेळाव्या प्रसंगी बोलत होते.अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात पाटील म्हणाले,शेतकऱ्यांच्या उसाला प्रति टन ५ हजार रुपये मिळाले पाहिजे यासाठीपण चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला पाठिंबा दिला आहे. देशासाठी तेलंगणा राज्याचा पॅटर्न यशस्वी होऊ शकतो. त्यासाठी सर्वांनी बी. आर.एस. भारत राष्ट्र समिती या पक्षाला पाठिंबा देणे गरजेचे आहे
यावेळी पुणे जिल्हा समन्वयक बी. जी. देशमुख, किसान सेलचे प्रदेश अध्यक्ष माणिकदादा कदम,महाराष्ट्र कार्याध्यक्ष कालीदास आपेट,उपाध्यक्ष ऍड अजित काळे,कोल्हापूर जिल्हा संघटक राजेश उर्फ बाळ नाईक,कोल्हापूर जिल्हा समन्वयक प्रोफेसर तोहीद बक्षु,सांगली जिल्हा महिला संघटक शर्वरी पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.