म्युझिक लव्हर्स म्युझिक अकॅडमी अँण्ड कराओके स्टुडिओचे उद्घाटन
schedule27 Oct 20 person by visibility 989 categoryलाइफस्टाइल
रिलायन्स मॉल जवळ लक्ष्मीपुरी कोल्हापूर येथे म्युझिक अकॅडमी अँण्ड कराओके स्टुडिओचे उदघाटन करण्यात आले. महापौर निलोफर आजरेकर, माजी आमदार डॉक्टर सुजित मिणचेकर यांच्या उपस्थित हा कार्यक्रम झाला. प्रणिता डिगे यांनी आजरेकर यांचे स्वागत केलं. तर मिलिंद डिगे यांनी आमदार मिणचेकर यांचे स्वागत केले. समाज भूषण पुरस्कार प्राप्त सदानंद डिगे यांनी कराओके स्टुडिओ ची माहिती दिली. महापौर आजरेकर यांनी शुभेच्छा दिल्या. माजी आमदार मिणचेकर यांनी गाणे गात कार्यक्रमाचे सुरुवात केली. गाणे शिकणाऱ्यांना एक व्यासपीठ असल्याचे मत मिणचेकर यांनी व्यक्त केलं.
प्रोप्रायटर मिलिंद डिगे यांच्या बॅनरखाली आर्केस्ट्रा म्युझिक लव्हर्स हिंदी गाण्याचा कार्यक्रम 'सूरताल' मराठी वाद्यवृंद 'आर्केस्ट्रा रंगीला' आर्केस्ट्रा या बरोबर छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित बहारदार गीतांचा कार्यक्रम केले जातात याचा लाभ जनतेने घ्यावा असेही आवाहन करण्यात आले.
स्टुडिओच्या तील साऊंड इफेक्ट सिस्टीम व डेकोरेशन सागर मोर्य यांनी केले तर राकेश कोल्हे, भिकू कांबळे, संजय चौगुले, संदीप भोसले यांनी सहकार्य केले. र्् यावेळी कलापथक निर्माता संघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मुकुंद सुतार, सरगम कराओके स्टुडिओचे निर्माते जावेद नायकवडी, आरपीआय आठवले गटाचे जिल्हा नेते सतीश माळगे मुक्त नायक चे संपादक देवदास बानकर, पप्पू राजपूत, दिपक तावडे, सुनील पोळ, वसंत जाधव, गोपाल जेधे, कोल्हापूर जिल्हा कलापथक कलाकार संघटनेचे अध्यक्ष विश्वास ढाले, संन्मती मेडिकल मॉलचे प्रोप्रायटर रोहित हंकारे प्रभाकर कांबळे, रोहित डिगे, विशाल डिगे आदी मान्यवर उपस्थित होते.