वृक्ष तोडणाऱ्या जंगलाच्या *राजा*चा गुरु कोण
schedule09 Feb 25 person by visibility 315 categoryगुन्हे

वृक्ष तोडणाऱ्या जंगलाच्या *राजा*चा गुरु कोण
कोल्हापूर;
परवानगी पेक्षा जास्त वृक्ष तोडणाऱ्या ठेकेदाराला पाठिंबा देणारा टोळीचा 'राजा' नेमका कोण आहे. त्यांचा गुरु कोण आहे ही बघण्याची वेळ आता जनतेवर आली आहे. पाटील यांच्या हातात पर्यावरणाचा उज्वल विकास होत असताना वृक्षतोडीला कोण जबाबदार आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे
म्हाळसवडे (ता. शाहूवाडी) येथील शासकीय गायरानमधील ८९५ झाडांची बेकायदा कत्तल केली आहे. याबद्दल ठेकेदार अबूताहेर अल्लाहुद्दीन तकीलदार (रा. आजरा) याला एक कोटी तीन लाख ४७ हजार ५०० रुपयांचा दंड केला. मलकापूर वनपाल रसिद अल्ली गारदी यांना शासन सेवेतून तत्काळ निलंबित केले आहे.
उपवन रक्षक कार्यालयाकडून वर्षभरात 42 हजार 270 झाडे तोडण्यात आली. परवानगी पेक्षा झाडे तोडले असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत आहेत. झाडे तोडण्यास चा जंगलाचा नायनाट करणारा 'राजा, त्याच्या दरबारात असणारा *पाटील* पर्यावरणाचे *उज्वल* भविष्य कसं बघणार या वृक्षतोडीला कोण जबाबदार आहे का नाही हे सर्वांना कोण *प्रसाद* देऊन आशीर्वाद देते ही बघण्याची वेळ आता जनतेवर आली आहे.
मुंग्या आलेले प्रोजेक्ट, मालकी, गायरात आदी कारणासाठी मालकी किंवा गायरान या विभागातील झाडाची तोड केली जाते. झाडाला रीमार्क करून ते तोडण्यायोग्य असेल तरच ते झाड तोडण्यासाठी परवानगी दिली जाते.
वनरक्षक विभागाकडून अशा कोणत्याही प्रकारची तपासणी न करता निवळ कागदपत्रे सही करून झाडाची कत्तल केली जात आहे. 2023 -24 या वर्षभरात बारा तालुक्यात 42 हजार 276 झाडे तोडल्याची नोंद असली तरी याची संख्या लाखोच्या वरती असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळत आहेत. वृक्षतोड करणाऱ्या ठेकेदाराची या कार्यालयात सारखी उठबस असते. या ठेकेदाराला कार्यालयातील राजाचा आशीर्वाद आहे.