Awaj India
Register
Breaking : bolt
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात* *आयईआयचा स्टुडन्ट चाप्टर सुरू*टोप हायस्कूल टोप मध्ये क्रीडा महोत्सवाचा जल्लोष प्रारंभनॅशनल कुस्ती अकॅडमी नंदगावच्या कुस्तीपटूंची यशस्वी कामगिरीविकास विद्या मंदिर सरनोबतवाडीत साकारत आहे डिजिटल क्लासरूमसकस आहार घेण्याचं विद्यार्थीनींना आवाहनगोकुळला ‘सर्वोत्कृष्ट प्रक्रिया तंत्रज्ञान व कार्यप्रणाली पुरस्कार’महाराष्ट्रातील पहिल्या सेंटर फॉर फ्युचर स्किल्सचे उद्घाटन*२३ रोजी उधळणार विजयाचा गुलाल - सौ. शौमिका महाडिकमी कधीही चुकलो नाही आणि चुकणारही नाही : राजेश क्षीरसागरसर्वसामान्य, व्यावसायिकांना लुटणे हाच लाटकर यांचा उद्योग - सुजित चव्हाण

जाहिरात

 

कोल्हापुरची टॅटूवाली

schedule31 May 21 person by visibility 988 categoryलाइफस्टाइल

पूजा कदम ( कोल्हापूर) : दिवारमधील अमिताभ बच्चनच्या हातावरील मेरा बाप चोर है, या गोंदवलेल्या अक्षरांपासून संपूर्ण शरीरावर आवडती अक्षरे, नावं, आवडते प्राणी काढून मिरवण इथपर्यंत टॅटूचा प्रवास येऊन पोहोचला आहे. शरीरावर गोंदवून घेणं हे पूर्वीच्या काळापासून चालत आलंय. एखाद्या आजीच्या कपाळावर हातावर गोंदण बघितलं की तरुण मुलं मुली त्याला नाव ठेवतात पण टॅटू काढून घ्यायला एका पायावर तयार होतात. मुंबई पुण्यातल्या मोठ्या शहरात एका महिलेने टॅटू काढणं आणि तिच्याकडून काढून घेणं काही नवीन नाही. पण, कोल्हापूर सारख्या शहरात ही अप्रूप करण्याचीच गोष्ट आहे. होय आज आपण भेटणार आहोत कोल्हापूर मधल्या टॅटूवालीला ...

दीपालीच शिक्षण अगदी जेमतेम. 11वी मध्ये असताना तीच लग्न झालं आणि पाहिलं बाळ पोटात असताना तिने 12 वीची परीक्षा दिली. त्यात ती उत्तम मार्कानी पासही झाली. मात्र, मुलांचं संगोपन महत्त्वाचं म्हणून तिने शिक्षणाला रामराम ठोकला. त्यांनतर मुलांच्या शिक्षणात ती स्वतःच शिक्षण विसरून गेली. आज तिच्या लग्नाला 13 वर्षे झालीत. 13 वर्षात तिने स्वतःच्या पायांवर उभं राहण्यासाठी अनेक प्रयत्न केले. आवड नसतानाही नर्सिंग क्षेत्रात शिक्षण घेतलं. पण, त्या क्षेत्रात तिला करिअर करता आलं नाही. कारण तिला कला क्षेत्राची आवड होती आणि तिला वेगळं काहीतरी करायचा ध्यास होता. 

दोन वर्षांपूर्वी मिस्टरांच्या मित्रांनी दिपालीला टॅटूबद्दल कल्पना देऊन त्या क्षेत्रात काहीतरी नक्कीच करू शकतेस अस सांगितले. इच्छा तर होती पण शेवटी एका लग्न झालेल्या स्त्रीला स्वतः निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नसते हेच खरे. स्त्रीने मेहंदी रांगोळी चित्रकला याची आवड जपावी मात्र समाजाने आखलेल्या चौकटीबाहेर जाऊन मुलांच्या अंगावर टॅटू रेखाटावे यासाठी तिला कोणी पाठिंबा देत नाही. अगदी हेच दीपालीच्या बाबतीत झालं. या क्षेत्रात यायला तिला संघर्ष करावा लागला. या संघर्षात तिच्या हाताचे एक बोट निकामी झाले. पण तरीही तिने हार मानली नाही. सुरुवातीला मिस्टर आणि मग घरच्या सगळ्यांनी या गोष्टीला विरोध केला. पण नंतर तिच्या मिस्टरांनीच तिला पाठबळ दिलं. आणि तिने टॅटू शिकून ते काढायला सुरुवात केली. तिने स्वतःच टॅटू स्टुडिओही उभा केला. 

दीपाली सांगते की, अंगावर टॅटू काढून घेणं वेदनादायक असतं खरं, पण अनेक जण फॅशन ट्रेंडपायी या वेदना सहन करायला तयार असतात. कुणाला आपल्या भावना या टॅटूतून दाखवून द्यायच्या असतात, तर कुणाला आपलं प्रेम. नेमके तेच या टॅटूतून उतरवण्याचा मी प्रयत्न करते.  

महिलांसाठी सर्वच क्षेत्र खुली आहेत. मेहंदी काढताना कलाकाराच्या हातात असलेली नाजूकता टॅटूसाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे मुली आणि महिलांनी मेहंदी आणि रांगोळी यातच अडकून न राहता टॅटू क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करावा. यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही दीपाली म्हणाली.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes