Awaj India
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात अंमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई; शरीरास घातक इंजेक्शन आणि गांजासह दोघे ताब्यातइचलकरंजीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई; सव्वा दोन लाखांच्या गांजासह दोघे जेरबंदशिवसेना समन्वयक सत्यजित (नाना) कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमकामगिरी दाखवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा’ जि.प प्रशासनाला इशाराडी. वाय. पाटील फार्मसीची अपेक्षा वक्तृत्व स्पर्धेत प्रथमशिक्षकांच्या कमतरतेवर जिल्हा परिषद सदस्यांचा मदतीचा हातके. एम. सी कॉलेज मध्ये "भू पर्यावरणीय दिन आणि संकल्पना" या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा संपन्न....डी वाय पाटील अभिमत विद्यापीठ देशात नवव्या तर राज्यात तिसऱ्या स्थानी*‘तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा’चा संदेश; प्राची माळीने नेत्रदानातून दिली प्रेरणामहायुतीच्या नेत्यांनो, आश्वासन लक्षात आहे काय?

जाहिरात

 

इचलकरंजीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई; सव्वा दोन लाखांच्या गांजासह दोघे जेरबंद

schedule03 May 26 person by visibility 32 category

 
​इचलकरंजी:
कोल्हापूर जिल्हयातील अंमली पदार्थ विक्री आणि वाहतूक करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी कडक मोहीम उघडली आहे. याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) इचलकरंजी येथे धाड टाकून ४ किलो १५० ग्रॅम गांजासह दोन तरुणांना अटक केली. त्यांच्याकडून गांजा, मोपेड आणि मोबाईल असा एकूण २ लाख २४ हजार २५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार, २ मे २०२६ रोजी करण्यात आली.  
​अशी झाली कारवाई:
पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे उच्चाटन करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी विविध पथके तयार केली होती. दरम्यान, पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इचलकरंजी येथील नदीवेस जॅकवेल जवळ काळ्या रंगाच्या ॲक्टिव्हा मोपेडवरून दोन तरुण गांजा विक्रीसाठी येणार आहेत.  
​मिळालेल्या माहितीची खात्री पटल्यानंतर पोलीस निरीक्षक दत्तात्रय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि त्यांच्या पथकाने परिसरात सापळा रचला. संशयित तरुण तिथे येताच पोलिसांनी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले.  
​अटक केलेले आरोपी:
१) सारंग खंडु भोसले (वय २१, रा. गुलमोहर कॉलनी, मिरज, जि. सांगली)
२) अभय दिगंबर धुमाळ (वय २१, रा. बावणे गल्ली, इचलकरंजी, जि. कोल्हापूर)  
​जप्त मुद्देमाल:
​४ किलो १५० ग्रॅम गांजा  
​ॲक्सीस मोपेड  
​मोबाईल फोन आणि इतर साहित्य  
​एकूण किंमत: २,२४,२५०/- रुपये  
​पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक श्री. आण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या टीमने केली आहे.  

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes