+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustपेन्शनसाठी हजारो दिव्यांग आक्रोश मोर्चात सहभागी होणार adjustबालिंगा येथील जूना दगडी कमानी पुल वाहतुकीसाठी बंद* adjustपूरबाधित नागरिकांसाठी निवारा केंद्राचा प्रस्ताव तयार करा : adjustपाण्यात बसून शिकतायेत पणोरे गावची मुले adjustशिवाजी विद्यापीठाच्या तीन दिवसाच्या परीक्षा पुढे ; भारतीय विद्यार्थी मोर्चा च्या मागणीला यश adjustविकसीत भारतासाठी योग्य अर्थसंकल्प adjustविद्यार्थीनींना मिळाली आरोग्य रक्षणाची माहिती adjustखोटी आश्वासने देणारे लॉलिपॉप बजेट! adjustजिल्ह्यातील 78 बंधारे पाण्याखाली* *राधानगरी धरणातून 1500 क्युसेक विसर्ग* adjustराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यादिवशी ड्रोन कॅमेरा चित्रिकरणास बंदी*
schedule06 Dec 23 person by visibility 95 categoryराजकीय
आवाज इंडिया
   कोल्हापूर - कोल्हापुरातील संभाजीनगर पेथील बस स्थानकाच्या पुनर्बांधणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे . त्यामुळे जानेवारी महिन्याच्या अखेरीस येथून एसटी बसची बस सेवा सुरळीतपणे सुरू होईल, अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली . आज आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी या बस स्थानकाच्या कामाची पाहणी करून, प्रलंबित कामे मार्गी लावण्याच्या सूचना ठेकेदार तसेच अधिकाऱ्यांना दिल्या . या बस स्थानकाचं नाव श्री छत्रपती संभाजी महाराज नगर बसस्थानक, असे करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी यावेळी सांगितले. या अत्याधुनिक बसस्थानकामुळे राधानगरी, भुदरगड, गगनबावडा या तालुक्यांसह नजिकच्या सर्व भागातील नागरिकांची सुलभ प्रवासाची सोय होणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

   आमदार सतेज पाटील हे परिवहन राज्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्र राज्यातील एसटी बस सेवा ही सर्वसामान्य माणसांचा आधार असल्याने राज्यातील सर्व एसटी बस स्थानके अधिक सुविधायुक्त होण्यासाठी भरीव निधी मंजूर करून दिला होता. यात कोल्हापूर जिल्ह्यातील,कोल्हापूर शहरामधील संभाजीनगर येथील संभाजीनगर बस स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी ९ कोटी ८० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला होता .याबरोबरच जोतिबा बस स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी २ कोटीं, गगनबावडा बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी १ कोटीं, गडहिंग्लज बस स्थानकाच्या नुतणीकरणासाठी २ कोटीं, कागल बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी १ कोटीं, इचलकरंजी बस स्थानक नुतनीकरणासाठी २ कोटीं, मलकापूर बस स्थानक नुतनीकरणासाठी १ कोटीं, वाठार बस स्थानक पुनर्बांधणीच्या कामासाठी दीड कोटीं, वडगाव बस स्थानक नुतनीकरणासाठी १ कोटी ४४ लाखांचा आणि जयसिंगपूर बस स्थानकाच्या विस्तारीकरणासाठी २ कोटींचा निधी मंजूर केला होता. यातून या बस स्थानकांची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत . 
            यातील कोल्हापूर शहरातील संभाजीनगर बस स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी ९ कोटी ८० लाखांचा निधी आमदार सतेज पाटील यांनी मंजूर करून दिला होता. त्यानंतर जुलै २०२२ मध्ये या कामाची वर्क ऑर्डर होऊन, ऑगस्टमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. सध्या या संभाजीनगर बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव असे अत्याधुनिक बसस्थानक तसेच बारामतीनंतर दुसरे, असे हे बसस्थानक पूर्णत्वास येत आहे .या बस स्थानकाच्या पुनर्बांधणी कामाची पाहणी आज आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी केली. त्यांनी या बस स्थानकाच्या सर्व कामांची प्रत्यक्ष जाग्यावर भेट देत, पाहणी केली. याठिकाणची विद्युत व्यवस्था, फायर सेफ्टी, ड्रेनेज लाईन, रंगरंगोटी, कंपाउंड वॉल, गेट, काँक्रिटीकरण, पेव्हींग ब्लॉक, अशी प्रलंबित कामे लवकर पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी ठेकेदार आणि एसटी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या कामाचे कॉन्ट्रॅक्टर एस .एन. पोवार, एसटी विभागातील इलेक्ट्रिक विभागाच्या कनिष्ठ अभियंता क्षितिजाराजे नाईक -निंबाळकर यांनी येथील कामांबाबतची माहिती आमदार सतेज पाटील यांना यावेळी सांगितली .
     या संभाजीनगर बस स्थानकाच्या पुनर्बांधणीचं काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या जानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत या बस स्थानकाचे उर्वरित कामही लवकरच पूर्ण होईल,अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली. या संभाजीनगर बस स्थानकाचे नामकरण श्री छत्रपती संभाजी महाराजनगर बस स्थानक, असे करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी यावेळी सांगितले. 
    
        यावेळी तायवाडे - पाटील असोसिएट्सचे आर्किटेक्चर हर्षवर्धन तायवाडे - पाटील, मेसर्स एस . एन . पोवार फर्मचे कॉन्ट्रॅक्टर एस. एन. पोवार, एसटी विभागाचे विभागीय अभियंता मनोज लिंग्रस, कनिष्ठ अभियंता संदीप दड्डीकर, इलेक्ट्रिक विभागाच्या कनिष्ठ अभियंता क्षितिजाराजे नाईक - निंबाळकर, संभाजीनगर आगाराचे आगार व्यवस्थापक शिवराज जाधव, विभाग नियंत्रक अनघा बारटक्के, यांच्यासह माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, दुर्वास कदम, मधुकर रामाणे सुयोग मगदूम, दिग्विजय मगदूम, धीरज पाटील इजाज नागरकट्टी, विश्वास गुरव, दिलीप टिपुगडे, यशवंत शिंदे, सुनील वर्मा, दिलीप मिरजे, रोहित मिरजे, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते .